Full Width(True/False)

देशभक्तीपर सिनेमे का होतात लोकप्रिय? अक्षयनं सांगितलं कारण

मुंबई: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं 'केसरी', 'एअरलिफ्ट', 'हॉलिडे- ए सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्यूटी' आणि 'मिशन मंगल' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करून देशाच्या प्रती आपलं प्रेम जाहीर केलं आहे. अक्षय कुमारचे हे सर्वच चित्रपट देशभक्तीवर आधारित आहेत आणि सुपरहिट ठरले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय कुमारनं देशभक्तीवर आधारित असलेले चित्रपट लोकप्रिय का ठरतात यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. सध्या त्याचा आगामी चित्रपट ''च्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. हा देखील एक आहे. या चित्रपटात अक्षय कुमार एका गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. जो त्याच्या देशाच्या सुरक्षेसाठी काहीही करण्यासाठी तयार असतो. पण असे देशभक्तीवर आधारित चित्रपट नेहमीच लोकप्रिय का होतात याचं कारण आता अक्षय कुमारनं सांगितलं आहे. अक्षय म्हणाला, 'भारतात नाही तर इतर देशातही प्रत्येकजण आपल्या देशावर खूप प्रेम करतो. त्यामुळेच हे नेहमी शक्य होतं.' सध्या अक्षय कुमार 'बेल बॉटम'च्या रिलीजची तयारी करत आहे. हा चित्रपट येत्या १९ ऑगस्टला रिलीज होत आहे. या चित्रपटासाठी अक्षय कुमार खूप उत्साहित आहे. या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त वाणी कपूर, लारा दत्ता भूपति आणि हुमा कुरैशी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज होण्यासाठी प्रेक्षकांसोबत अक्षय कुमार देखील तेवढाच उत्साहित आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3z2XWMQ