Full Width(True/False)

मराठी चित्रपटांसाठी मी तर तयार आहे, पण... मनोज वाजपेयी झाला व्यक्त

० '' सीरिजचा अनुभव कसा होता?- संपन्न करणारा असा हा अनुभव होता. या सीरिजची कथा एका रात्रीपुरती मर्यादित आहे. अशा प्रकारच्या कथेत मी पहिल्यांदाच काम केलं. प्रत्येक बारीकसारीक गोष्टीची काळजी घ्यावी लागली. एखादी गोष्ट इकडे-तिकडे झाली असती तर त्याचा परिणाम संपूर्ण कथेवर झाला असता. त्यातही माझं अर्ध्याहून अधिक संभाषण फोनवर होतं. संपूर्ण कथेची सूत्र माझ्या हातात होती. तो भाग आव्हानात्मक वाटला. ० पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना काय आव्हानं होती?- पोलिस अधिकाऱ्याच्या पदानुसार भाषा वापरणं आवश्यक होतं. ते ठरावीक शब्द, हालचाल आणि हावभाव यावर काम केलं. विशेष म्हणजे वर्दीतला अधिकारी दाखवण्यापेक्षा त्या वर्दीतला माणूस दाखवण्यावर अधिक भर दिला. ० सीरिजमध्ये एक तरी पोलिस पात्र दाखवण्यामागे काय उद्देश असावा असं तुम्हाला वाटतं?- आपल्या सगळ्यांच्या मनात पोलिसांप्रती आदरभाव असतो. याचाच उपयोग कथेसाठी केला जातो. कथेच्या एखाद्या वळणावर पोलिस अधिकाऱ्याची एंट्री दाखवली जाते, त्यामुळे कथेला एक प्रकारचं वजन मिळतं. या तंत्राचा वापर सर्रास होऊ लागला आहे. ही बाब अतिसामान्य झाली आहे. ० ओटीटीने तुम्हाला काय दिलं?- या माध्यमाने मला प्रेरणा दिली. एकाच प्रकारच्या भूमिकेच्या साच्यात न राहता नानाविध प्रकारची पात्रं साकारायला मिळाली. ० सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि रोस्टिंग या प्रकाराबाबत काय वाटतं?- एखाद्याला ट्रोल किंवा रोस्ट करण्याची संधी सोशल मीडियानेच दिली आहे. त्या माध्यमावर लोक आपल्या मनातली भडास काढतात किंवा एकमेकांची बदनामी करतात. हे माध्यम विषासारखं घातक आहे. या माध्यमाचा योग्य प्रकारे वापर करायचा आहे याची जाण आल्यावरच हे सगळं थांबेल. विशेष करून आई-वडिलांनी मुलांच्या सोशल मीडिया वापरावर लक्ष ठेवणं काळाची गरज आहे. सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढतंय, यावर नियंत्रण मिळवायला हवं. यासाठी आपल्या सगळ्यांच्या योगदानाची गरज आहे. ० मराठीमध्ये कधी दिसणार?- मराठी चित्रपटांसाठी विचारणा होण्याची वाट बघतोय. मी तर तयार आहे. ० तुमचा फिटनेसमंत्र काय आहे?- वेळेवर झोपा आणि उठा, हा माझा साधासुधा मंत्र आहे. तसंच पौष्टिक खाण्यावर भर देतो. मी सयाजी शिंदे यांच्या सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतो. त्याचप्रमाणे गेल्या महिन्यात महाराष्ट्रात पूर आला होता. ते नुकसान भरून काढण्यासाठी मला ज्याप्रकारे मदत करणं शक्य होतं, त्याप्रकारे करतोय. सामाजिक कार्य यापुढेही सुरू राहणारच आहे. -


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3j5IdHo