Full Width(True/False)

आतापर्यंतचे सर्वात मोठे स्पीकर्स, Xiaomi Mi TV 5X मध्ये असतील 40W स्टीरियो स्पीकर्स, २५ ऑगस्टला भारतात एन्ट्री

नवी दिल्लीः ला भारतात गुरुवारी म्हणजेच २६ ऑगस्ट रोजी लाँच करण्यात येणार आहे. शाओमी २६ ऑगस्टला आपल्या इवेंट मध्ये नवीन स्मार्ट टीव्हीवरून पडदा हटवणार आहे. रिलीज आधी शाओमी आपल्या अधिकृत मी टीव्ही इंडिया सोशल मीडिया अकाउंट्स वर स्मार्ट टीव्हीचे फीचर्स ची माहिती दिली आहे. आता कंपनीने आगामी टीव्हीच्या स्पीकर्स संबंधी माहिती दिली आहे. वाचा: टीव्ही मध्ये जबरदस्त पिक्चर क्वॉलिटी शिवाय, टीव्हीत जबरदस्त स्पीकर्स असतील. शाओमीच्या लेटेस्ट टीझर वरून हा खुलासा झाला आहे की, मी टीव्हीत 5X मध्ये 40 वॉट स्टिरियो स्पीकर्स दिले जातील. शाओमीने याआधी खुलासा केला होता की, टीव्हीत डॉल्बी एटमॉस साउंड असेल. त्यामुळे अपेक्षा केली जात आहे की, मूव्ही, डॉक्यूमेंट्री आणि फेव्हरिट टीव्ही शो पाहताना ऑडियो एक्सपीरियन्स मिळतील. वाचा: शाओमीच्या एका अधिकृत पणे ट्विट करून सांगितले की, नवीन टीव्हीत कोणत्याही मी टीव्हीत आतापर्यंत सर्वात मोठे स्पीकर्स दिले जातील. परंतु, मी टीव्ही एक्स्ट्रीम एडिशन मध्ये १०० वॉट स्पीकर्स दिल गेले आहे. भारतात मी टीव्ही 5X मध्ये मोठे स्पीकर्स मिळतील. Mi QLED TV 75 अजूनही भारतातील सर्वात महागडा टीव्ही आहे. जो ३० वॉट स्पीकर्स सोबत येतो. वाचा: मी टीव्ही 5X मध्ये एक ट्राय बेजल लेस डिझाइन दिली आहे. यात 4K डिस्प्ले, डॉल्बी एटमस आणि अँड्रॉ़यड टीव्ही सारखे फीचर्स दिले आहेत. सध्या मी टीव्ही एक्सची भारतातील किंमत संबंधी अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. मी टीवी 4X 55 ला नोव्हेंबर 2019 मध्ये ३४ हजार ९९९ रुपयात लाँच केले होते. आता या टीव्हीला ४४ हजार ९९९ रुपयात विकले जात आहे. वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sFMjJv