मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योगपती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणी १९ जुलै २०२१ रोजी पोलिसांनी अटक केली. पॉर्न व्हिडिओ तयार करणे आणि ते इंटरनेवर पेड अॅपद्वारे वितरीत करण्याचा आरोप राजवर ठेवण्यात आला आहे. राज जामिनावर बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत आहे परंतु त्याला अद्याप जामिन मिळालेला नाही. राज कुंद्राची कृष्णकृत्ये समोर आल्यानंतर त्याची बायको शिल्पा शेट्टीच्या खासगी आयुष्याबरोबरच व्यावसायिक आयुष्यावरही या सगळ्याचा विपरीत परिणाम झाला. राजला अटक झाल्यामुळे सुपर डान्सर या कार्यक्रमात जवळपास तीन आठवडे शिल्पा सहभागी होऊ शकली नव्हती. इतकेच नाही तर या वादामुळे शिल्पाच्या हातातून अनेक महत्त्वाचे प्रोजेक्टस निघून गेले. राजपासून वेगळे राहण्याचा विचार? शिल्पा हळूहळू तिचे आयुष्य पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. ती पुन्हा एकदा सुपर डान्सर ४ या कार्यक्रमाच्या सेटवर परतली असून कार्यक्रमाच्या चित्रीकरणात व्यग्र झाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झालेल्या घटनेवर कुणीही काहीही प्रश्न विचारणार नाही, या अटीवरच शिल्पा या कार्यक्रमात परतली आहे. दरम्यान, शिल्पा संदर्भात आणखी एक बातमी समोर आली आहे ती म्हणजे भविष्यात शिल्पा आपल्या दोन्ही मुलांसोबत राजपासून वेगळे राहण्याचा विचार करत आहे. शिल्पा अजूनही धक्क्यातच आहे शिल्पाचा एक जवळचा मित्र म्हणाला की, राज कुंद्रावरून निर्माण झालेला वाद कमी होण्याऐवजी दिवसागणिक वाढतच चालला आहे. राज कुंद्राचे नाव पॉर्न व्हिडिओ प्रकरणात आल्यामुळे शिल्पाला मोठा धक्का बसला आहे. वाईट मार्गाने कमावलेल्या पैशांमधूनच राजने तिच्यासाठी हिरे आणि इतर मौल्यवान वस्तू खरेदी केल्याची माहिती शिल्पाला नव्हती. स्वतःच्या कमाईतून मुलांना वाढवणार शिल्पाच्या या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, शिल्पाला राजच्या पैशांना हातही लावायची इच्छा नाही. शिल्पाच्या या मित्राने पुढे सांगितले की, ' शिल्पा स्वतः काम करते आहे आणि ती तिच्या मुलांचे संगोपन करण्यासाठी सक्षम आहे.' दरम्यान, शिल्पाचा हंगामा २ नुकताच ओटीटीवर प्रदर्शित झाला तर निकम्मा हा सिनेमा चित्रीकरणासाठी तयार असल्याची माहिती मिळाली आहे. सोशल मीडियावर झाली भावुक राजला अटक झाल्यापासून शिल्पा सोशल मीडियापासून काहीशी लांब होती. परंतु ती आता पुन्हा सक्रीय झाली आहे. शिल्पाने तिच्या इन्स्टाग्रावर योगमधील काही प्रेरणादायी विचार शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरही एका पुस्तकातील 'मिस्टेक' या प्रकरणातील फोटो शेअर केले होते. दरम्यान, शिल्पा राजच्याच घरात राहणार की, मुलांना घेऊन वेगळी राहणार यावर तिने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. चाहत्यांना दिल्या जन्माष्टमीच्या शुभेच्छा गोकुळाष्टमीच्या निमित्ताने सर्व चाहत्यांचे अभिनंदन करताना शिल्पाने एक संदेश लिहिला की, “गोकुळाष्टमीच्या तुम्हा सर्वांना अनेक शुभेच्छा. बाल गोपाळ आपल्या सर्वांवर आशीर्वाद देवो.” यासह, शिल्पाने भगवद्गीतेतील एक ओळ लिहिली की, ‘देव त्यांच्याबरोबर आहे ज्यांचे मन, आत्मा आणि इच्छा क्रोधांपासून मुक्त आहेत आणि जे स्वतःला ओळखतात.’
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3yx58jx