मुंबई : 'स्टुडंट ऑफ द इअर' सिनेमातून अभिनयाच्या करिअरला आलिया भट्टने सुरुवात केली. तेव्हापासून तिच्या चाहत्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. आलिया सोशल मीडियावरही खूप सक्रीय असते. त्यामुळे आपल्या चाहत्यांसाठी आलिया सतत वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. त्यावर तिचे चाहते भरभरून लाइक्स आणि कमेन्ट करत असतात. अलिकडेच आलियाने तिचे खूप सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधील आलियाचा फ्रेश लूक दिसत आहे. निसर्गाच्या सान्निध्यामध्ये गेलेल्या आलियाचे हे फोटो खूपच सुंदर आहेत. आलियाने नदीकिनारी हे फोटो काढले आहेत. या फोटोमध्ये आलिया खूपच खूष दिसत आहे. या फोटोंमधील आलियाचे निखळ हास्य पाहून तिचे सर्व चाहते घााळ झाले आहेत. आलियाने हे फोटो शेअर करत लिहिले की, 'रस्त्यावरून जाताना काही वेळ काढून असे फोटो काढायला हवेत.' आलियाचे या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी जशा कमेंट केल्या आहेत तसे अनेक सेलिब्रिटींनीदेखील तिच्या फोटोंवर कमेंट केल्या आहेत. आलियाचे हे फोटो पाहून बॉलिवूडचा बाजीराव अर्थात रणवीर सिंगदेखील फिदा झाला. त्याने आलियाचे फोटो पाहिल्यावर हार्टचे इमोजी शेअर केले. दरम्यान, आलियाच्या या फोटोंवर तिची आई सोनी राजदानने देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरम्यान, आलियाच्या कामाबद्दल सांगायचे तर तिचा ब्रह्मास्त्र, गंगुबाई काठीयावाड यांसारखे महत्त्वाचे सिनेमे प्रदर्शनासाठी तयार आहेत. परंतु करोनामुळे हे सिनेमे कधी रिलीज होणार हे अद्याप निश्चित नाही. तसेच फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा' या आगामी सिनेमातही ती दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत प्रियांका चोप्रा आणि कतरीना कैफ देखील दिसणार आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38GtyN7