मुंबई: टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने पदकाची कमाई केली. तिनं ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकलं. भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील ऑलिम्पिकमधील हे दुसरं पदक आहे. याच पार्श्वभूमीवर मीराबाईच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार अशी चर्चा सुरु झालीय. या चित्रपटाची निर्मिती लवकरच केली जाणार आहे. हा एक मणिपुरी चित्रपट असणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मीराबाई यांचा जीवनातील संघर्ष पाहायला मिळणार आहे. मीराबाई यांनी चित्रपटासाठी होकार दिल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. हा चित्रपट इंग्रजी आणि इतर काही भारतीय भाषांमध्ये डब करण्यात येणार आहे. तसंच यांची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्रीचा शोधही सुरु आहे. ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू ही पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3llaefD