मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार अनेकवेळा विविध कारणांमुळे वादाच्या भोव-यात अडकले आहेत. कधी संगीत चोरी करण्यामुळे तर कधी 'मी टू' सारख्या आरोपांमुळे. आता पुन्हा एकदा अनु मलिक यांच्यावर संगीत चोरीचा आरोप झाल्याने ते पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात अडकले आहेत. आताची ही संगीत चोरी थेट एका देशाच्या राष्ट्रगीताच्या चालीची झाल्याचा आरोप युझर्सने करत अनु मलिक यांच्यावर टीकास्र सोडले आहे. अनु मलिक आणि वाद हे समीकरण तसे नवीन नाही. याआधी देखील अनु मलिक यांच्यावर अनेकदा संगीत चोरीचे आरोप झाले आहेत. जेव्हा जेव्हा हे आरोप झाले, तेव्हा तेव्हा त्यांच्यावर कडाडून टीका झाली होती. आता देखील त्यांची चोरी उघड झाल्याने सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले जात आहे. कारण आता अनु मलिक यांनी आता तर थेट इस्रायलच्या राष्ट्रगीताचीच कॉपी केली आहे. जपानमधील टोकिओ येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये इस्रायलचा खेळाडू डॉग्लोपायटने सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर तिथे इस्रायलचे राष्ट्रगीत 'हातिकवाह' वाजवण्यात आले. हे राष्ट्रगीत ऐकल्यानंतर १९९६ मध्ये रिलीज झालेल्या 'दिलजले' या सिनेमातील 'मेरा मुल्क मेरा देश' हे गाणे भारतीयांना आठवले. या दोन्ही गाण्यांची चाल एकसारखी आहे. इस्रायलचे राष्ट्रगीत ऐकल्यानंतर सोशल मीडियावर अनु मलिक यांना ट्रोल करायला युझर्सनी सुरुवात केली. सोशल मीडियावर युझर्सने दिलेल्या कॉमेन्ट दरम्यान, अनु मलिक यांनी त्यांच्या सांगितीक कारकिर्दीमध्ये 'छम्मा छम्मा', 'बाजीगर ओ बाजीगर', 'एली रे एली', 'तुमसे मिल के दिल का जो हाल' यांसारखी एकाहून एक सरस अशी गाणी दिली आहेत. संगीत चोरी करण्याबरोबरच अनु मलिक यांच्यावर नेहा भसीन, श्वेता पंडित आणि सोना महापात्रा या गायिकांनी लैंगिक शोषणाचेही आरोप केले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3C6X2kn