Full Width(True/False)

बिग बजेट 'आदिपुरुष'मध्ये हनुमानच्या भूमिकेत दिसणार 'हा' मराठी अभिनेता

मुंबई :सध्या बॉलिवूडमध्ये एका बिग बजेट सिनेमांची जोरदार चर्चा आहे, तो म्हणजे ‘’. 'तान्हाजी' सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक ‘आदिपुरुष’ या महत्त्वाकांक्षी सिनेमाचं दिग्दर्शन करतोय. यात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास मुख्य भूमिकेत आहे. तसंच या सिनेमात अनेक मराठी कलाकारदेखील झळकणार आहेत. विशेष म्हणजे या सिनेमात हनुमानाच्या व्यक्तिरेखेत अभिनेता देवदत्त नागे दिसणार असल्याचं बोललं जात आहे. यासाठी देवदत्त मेहनत घेत असल्याचंही समजत आहे. यापूर्वी देवदत्त 'तान्हाजी' सिनेमात होता. देवदत्तसह ‘आदिपुरुष’मध्ये तृप्ती तोरडमल आणि चमकणार असल्याचंही समजतंय. ओम याच्या 'तान्हाजी द अनसंग वॉरिअर' या चित्रपटानंतर 'आदिपुरुष' हा दुसरा बिग बजेट चित्रपट आहे. या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तृप्तीने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यासंबंधीची माहिती दिली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3zUOMlC