Full Width(True/False)

महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित न झाल्यानं अक्षयच्या चित्रपटाला मोठा फटका, सहा दिवसात कमावले फक्त...

मुंबई: गेल्या २०-२२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हिंदीतील एका बड्या कलाकाराचा सिनेमा महाराष्ट्राला बगल देत उर्वरित भारतात गुरुवारी प्रदर्शित झाला. तो म्हणजे अक्षयकुमारचा ''. चित्रपट प्रदर्शित होऊन सहा दिवस झाले असले तरी, चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याचं चित्र आहे. समिक्षक आणि प्रेक्षकांनी चित्रपटाला पसंती दर्शवली असली तरी कमाईच्या बाबतीत चित्रपट मागे पडल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात चित्रपटानं केवळ १३ कोटींची कमाई केली आहे. रक्षाबंधन आणि विकेंडमध्ये चित्रपटानं ४.४० कोटींचा गल्ला जमावला. परंतु सोमवारी कमाईत ५० टक्के घट झाल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्रात सिनेमागृहं बंद असली तरी ती देशभरातील बहुतांश राज्यांमध्ये खुली करण्यात आली आहेत. म्हणूनच अक्षयकुमारने महाराष्ट्र सोडून इतर राज्यांत 'बेल बॉटम' हा सिनेमा प्रदर्शित केला आहे. पण याचा फटका चित्रपटाला बसल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रातील प्रेक्षकांना केव्हा पाहता येणार चित्रपट?'महाराष्ट्रात मी सिनेमागृहं बंद ठेवली आहेत का? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विचारपूर्वक सिनेमागृहं बंद ठेवली आहेत. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात सिनेमागृहं प्रेक्षकांसाठी खुली होतील; तेव्हा नक्कीच आम्ही सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करू', असं अक्षय कुमारनं म्हटलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38dDe12