Full Width(True/False)

सलमान खानला अडवणाऱ्या अधिकाऱ्याला शिक्षा नाही तर बक्षिस

मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानचा विमानतळावरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. टायगर ३ सिनेमासाठी परदेशात जाणाऱ्या सलमानला कागदपत्रांच्या छाननीशिवाय विमानतळाच्या आत प्रवेश करू न देणाऱ्या CISF चा अधिकारी अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर या अधिकाऱ्याचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक झाले. त्यानंतर या अधिकाऱ्यावर CISF ने कारवाई केली. तसेच त्याने मीडियाशी बोलू नये यासाठी त्याचा मोबाइल जप्त करण्यात आल्याच्या बातम्या आल्या. परंतु CISF ने असे काहीही घडले नसल्याचे स्पष्टीकरण दिले. CISF च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्वीट करण्यात आले आहे. त्यात असे नमूद करण्यात आले की, 'सोमनाथ मोहंतीवर कारवाई झाल्याच्या बातम्या चुकीच्या आणि निराधार आहेत. खरे तर संबंधित अधिकाऱ्याने त्याचे कर्तव्य चोख पद्धतीने निभावल्याबद्दल त्याला पुरस्कार देण्यात आला आहे.' दरम्यान, आणि कतरीना कैफ यांचे टायगर ३ सिनेमाच्या चित्रीकरणावेळचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. टायगर ३ सिनेमाचे दिग्दर्शन अमित शर्मा करत आहे. याआधी एक था टायगर सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खानने केले होते. तर टायगर जिंदा है सिनेमाचे दिग्दर्शन अली अब्बास जफरने केले होते. काय घडले होते नेमके सलमान खान २० ऑगस्ट रोजी त्याच्या टायगर ३ या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी रशियाला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर आला होता. जेव्हा सलमान विमानतळावर पोहचला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या छायाचित्रकारांनी आणि इतर लोकांनी त्याला घेरले. यानंतर तो आपल्या सुरक्षा रक्षकांसह विमानतळाच्या आत जाऊ लागला. दरम्यान, सीआयएसएफचे एएसआय सोमनाथ मोहंती यांनी सलमानला सुरक्षा तपासणीशिवाय आत जाण्यापासून रोखले यानंतर अभिनेता संपूर्ण कागपत्रांची छाननी होईपर्यंत विमानतळाच्या दारावरच थांबला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2WoQ4ak