नवी दिल्लीः Reliance Jio, Airtel, आणि Vodafone Idea ने गेल्या काही दिवसात आपले काही नवीन प्रीपेड प्लान लाँच केले आहेत. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात डेटा वापर करण्यासाठी कोणतीही लिमिट नाही. प्लानमध्ये एक सिमीत डेटा दिला जातो. याचा वापर वैधतेत कधीही केला जातो. हे प्लान त्या लोकांसाठी खास आहे. ज्यांना कमी डेटा लागतो. परंतु, कधी कधी जास्त डेटाची गरज पडते. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाचे ३० दिवसांची वैधता सोबत no daily data limit च्या प्लानसंबंधी माहिती देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः चा ३० दिवसांचा प्लान रिलायन्स जिओचा २४७ रुपयांचा प्लान ३० दिवसांच्या वैधते सोबत येतो. हा कोणत्याही कंपनीचा सर्वात स्वस्त ३० दिवसाचा प्लान आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना एकूण २५ जीबी डेटा मिळतो. डेटा वापरण्यासाठी कोणतीही डेली लिमिट नाही. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० SMS दिले जाते. यासोबतच जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः Vodafone Idea चा ३० दिवसांचा प्लान यासारख्या सुविधेसोबत वोडाफोन आयडियाकडे २६७ रुपयांचा प्लान आहे. म्हणजेच जिओ प्लानच्या तुलनेत २० रुपये महाग आहे. या प्लानमध्ये ३० दिवसांसाठी २५ जीबी डेटा मिळतो. सर्वच्या सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० SMS दिले जाते. याशिवाय, Vi Movies & TV चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः Airtel चा ३० दिवसांचा प्लान या तिन्ही प्लानमध्ये सर्वात महाग ३० दिवसांचा प्लान एअरटेलचा आहे. या प्लानची किंमत २९९ रुपये आहे. यात थोडी जास्त सुविधा आहे. एअरटेल प्लानमध्ये ग्राहकांना एकूण ३० जीबी डेटा दिला जातो. डेटाचा वापर करण्यास कोणतीही डेली लिमिट नाही. यात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० SMS शिवाय, Airtel Thanks, Prime Video मोबाइल एडिशन फ्री ट्रायल, आणि Airtel Xstream Premium सारखे मेंबरशीप मिळते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lo8dPM