Full Width(True/False)

अदनान सामी- 'भारतीय होणं हे तर माझ्या नशिबात होतं'

मुंबई- भारताचे नागरिक झालेले पाकिस्तानी वंशाचे गायक आणि संगीतकार यांचा वाढदिवस भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी येतो. अदनान सामी १५ ऑगस्ट २०२१ रोजी आपला ५० वा वाढदिवस साजरा करत आहेत. अदनान यांचा जन्म पाकिस्तानातील लाहोर येथे झाला. अदनान यांचा विश्वास आहे की त्यांना नेहमीच भारताचं नागरिकत्त्व हवं होतं. याचमुळे कदाचित त्यांचा जन्मही भारताच्या स्वातंत्र्यदिना दिवशी झाला. अदनान सामी म्हणाले की, त्यांचा जन्म १५ ऑगस्ट रोजी होणं हा फक्त योगायोग नसून त्यांच्या नशिबातच होतं. अदनान पुढे म्हणाले की, 'माझे भविष्य भारताशीच जोडले गेले होते. मी लहानपणापासूनच भारताच्या प्रेमात होतो आणि कदाचित देवाने मला माझं संपूर्ण लक्ष येथे केंद्रित करण्यास सांगितले. मी माझ्या आयुष्याच्या या घटनेला योगायोग म्हणणार नाही, ते त्याहून खूप जास्त आहे.' अदनान सामी पुढे म्हणाले की, 'देवाने ज्या प्रकारे माझं नशिब लिहिलं त्यावरून कळतं की मला एक भारतीयचं व्हायचं होतं होतं. हेच माझ्या नशिबात लिहिलं होतं. १९४७ मध्ये फाळणी होणं अत्यंत दुर्दैवी होतं, पण मी भारताशीच जोडला गेलेलो आहे हे सांगण्याची देवाचीही स्वतःची पद्धत आहे. कदाचित माझा वाढदिवस या दिवशी असणे हाच सर्वात मोठा संकेत होता.' अदनान सामी यांना २०१६ मध्ये भारतीय नागरिकत्व मिळाले. तरी त्यांचा विश्वास आहे की भारताशी त्यांचे संबंध त्याच दिवशी जोडले गेले होते जेव्हा ते पहिल्यांदा १९९९ मध्ये कामासाठी येथे आले होते. असं असलं तरी अदनान यांना भारतीय नागरिकत्व मिळवणे इतके सोपे नव्हते कारण त्यांचा अर्ज अनेक वेळा फेटाळण्यात आला होता. यानंतरही अदनान यांनी आशा सोडली नाही आणि शेवटी त्यांना भारताचे नागरिकत्व मिळाले. याबद्दल अधिक बोलताना अदनान म्हणाले की, 'लोकांना वाटते की मला सहजच भारताचे नागरिकत्व मिळाले. यासाठी मी किती वाट पाहिली आणि संघर्ष केला याची त्यांना कल्पना नाही. मी भारताचा नागरिक होण्यासाठी आणखी १६ वर्ष वाट पाहू शकलो असतो. याचमुळे या गोष्टीकडे मी कधीच उथळपणे पाहणार नाही.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2VWLIqX