मुंबई : हिंदी सिनेसृष्टीत कॉमेडीला वेगळे रूप देणारे यांनी नुकताच त्यांचा ६४ वा वाढदिवस साजरा केला. आपल्या सहजसुंदर अभिनयाने जॉनी लीवर यांनी कॉमेडीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. जॉनी यांनी आतापर्यंत ३५० हून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे. जॉनी लीवर यांनी आपल्या अभिनयाने लाखो लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. इतकेच नाही तर त्यांनी स्टँडअप कॉमेडीला त्यांनी लोकप्रिय केले. लहानपणापासूनच विनोदाची आवड हिंदी सिनेविश्वातील विनोदाला जॉनी लीवर यांनी लोकप्रियता मिळवून दिली. त्यांना आतापर्यंत १३ वेळा फिल्मफेअर पारितोषक मिळाले आहे. जॉनी यांचा जन्म १४ ऑगस्ट १९५७ मध्ये आंध्र प्रदेशात झाला. त्यांचे वडील प्रकाश राव जनमुला हिंदुस्थान लीवर फॅक्ट्रीमध्ये काम करायचे. जॉनी लहानपणापासूनच खूप विनोदी स्वभावाचे होते. ते कायम समोरच्याला हसवायचे, त्यामुळे मित्रमंडळींमध्ये ते खूप लोकप्रिय होते. जॉनी यांना दोन भाऊ आणि तीन बहिणी असून जॉनी हे सगळ्या भावंडांत मोठे होते. लहानपणापासून या सगळ्यांनी गरिबी अनुभवली. याच गरिबीमुळे जॉनी यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले आणि पेन विक्रेता म्हणून काम स्वीकारले. पेन विकण्याची त्यांनी अनोखी पद्धत शोधून काढली होती. ते बॉलिवूडमधील नटांची नक्कल करत पेन विकायचे. त्यामुळे त्यांच्याकडची पेन भरभरा विकली जायची. जॉनी प्रकाशचा झाला जॉनी लीवर जॉनी यांचे खरे नाव जॉनी प्रकाश आहे. जॉनी प्रकाश जॉनी लीवर कसे झाले. त्यामागे देखील मोठी कथा आहे. जॉनी देखील हिंदुस्थान लीवर कंपनीत काम करायचे. कंपनीमध्ये काम करताना ते अंगमेहनतीची कामे सहज करायचे. १०० किलो वजनाचे ड्रम ते सहज एक जागेहून दुसरीकडे न्यायचे. कंपनीत काम करत असताना देखील त्यांचा विनोदी स्वभाव तसाच राहिला. कंपनीतील मित्रमंडळींसमोर ते नटांच्या नकला करून दाखवयचे, विनोदी नकला करायचे. त्यामुळे त्यांचे नाव मित्रमंडळींनी जॉनी प्रकाश ऐवजी जॉनी लीवर असे ठेवले. जॉनी हे आघाडीचे मिमिक्री कलाकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक स्टेज शो केले आहेत. अशाच एका कार्यक्रमात सुनील दत्त यांनी त्यांना पाहिले. त्यांना जॉनी यांचे काम आवडले आणि त्यांना 'दर्द का रिश्ता' सिनेमामध्ये पहिला ब्रेक दिला. त्यानंतर जॉनी यांनी मागे वळून पाहिले नाही. जॉनी लीवर यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक यशाची शिखरे संपादन केली. त्यांचे अनेक सिनेमे सुपरहिट झाले. जॉनी लीवर यांचे २००० मध्ये २५ सिनेमे प्रदर्शित झाले. आज त्यांना सर्वजण हरहुन्नरी आणि गुणी अभिनेता म्हणून ओळखतात. परंतु जॉनी लीवर यांना सात दिवसांचा कारावासही सोसावा लागला होता. जॉनी यांनी तिरंग्याचा अपमान केला म्हणून त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली होती. कालांतराने जॉनी यांच्यावर ठेवलेला हा आरोप मागे घेण्यात आला.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3g5vItE