नवी दिल्लीः सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएल () ने १ ऑगस्टपासून आपल्या काही प्रीपेड मोबाइल प्लान व्हाउचर्स (PVs)आणि स्पेशल टॅरिफ वाउचर्स (STVs) मध्ये बदल केला आहे. या प्लान्सचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याची फक्त वैधता बदलली आहे. बेनिफिट्स मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. keralatelecom च्या रिपोर्टनुसार, ज्या ७ प्लानमध्ये बदल केला आहे. त्या प्लानमध्ये ४९ रुपये, ७५ रुपये, ९४ रुपयाचे स्पेशल टॅरिफ व्हाउचर आणि १०६ रुपये, १०७ रुपये, १९७ रुपये, ३९७ रुपयांच्या प्लानच्या व्हाउचरचा समावेश आहे. वाचाः ४९ रुपयांचा BSNL प्लान ४९ रुपयांचा स्वस्त स्पेशल टॅरिफ व्हाउचरमध्ये आधी २८ दिवसांची वैधता मिळत होती. आता ती कमी करून २४ दिवस केली आहे. बीएसएनएलच्या या प्लानचा वापर प्रीपेड ग्राहकांची वैधता वाढवण्यासाठी केला जावू शकतो. या प्लानमध्ये ४५ पैसे-मिनिटची कॉल रेट, २ जीबी डेटा आणि एकूण १०० एसएमएस मिळते. ७५ रुपये आणि ९४ रुपयाचे BSNL प्लान ७५ रुपयाचा रिव्हाइज्ड BSNL प्लान मध्ये ग्राहकांना ५० दिवसांची वैधता सोबत कोणत्याही नेटवर्कवर १०० फ्री कॉलिंग मिनिट, २ जीबी डेटा फ्री आणि फ्री BSNL ट्यून्स चा फायदा मिळतो. याच प्रमाणे ९४ रुपयांच्या प्लानमध्ये ६० दिवसांची वैधता सोबत कोणत्याही नेटवर्कवर १०० फ्री कॉलिंग मिनिट, ३ जीबी डेटा फ्री आणि फ्री BSNL ट्यून्सचा फायदा मिळतो. दोन्ही प्लानध्ये कॉलिंग मिनिट संपल्यानंतर ३० पैसे प्रति मिनिट चार्ज द्यावा लागतो. वाचाः १०६ रुपये आणि १०७ रुपयाचे BSNL प्लान कंपनीचे या दोन्ही प्लानची सुविधा एकसारखीच आहे. यात आधी १०० दिवसांची वैधता मिळत होती. ज्यात आता कमी करून ८४ दिवसांची दिली आहे. यासोबतच १०० फ्री कॉलिंग मिनिट, ३ जीबी फ्री डेटा आणि फ्री BSNL ट्यून्सचा फायदा मिळतो. १०६ रुपयांच्या प्लानमध्ये मिनिट संपल्यानंतर व्हाइस कॉलिंग चार्ज प्रति सेकंद आणि १०७ रुपयांच्या व्हाइस कॉलिंग चार्ज प्रति मिनिट हिशोबाप्रमाणे घेतला जातो. वाचाः १९७ रुपये आणि ३९७ रुपयाचे BSNL प्लान १९७ रुपयांच्या प्लानमध्ये सर्व नटेवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, रोज २ जीबी डेटा, रोज १०० एसएमएस आणि Zing Music अॅपचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. प्लानची वैधता १५० दिवसाची आहे. परंतु, फ्री सुविधा सुरुवातीला १८ दिवस मिळते. याच प्रमाणे ३९७ रुपयाच्या प्लानमध्ये स्रव नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज २ जीबी डेटा, रोज १०० एसएमएस, Lokdhun Content आणि बीएसएनएल ट्यून्स चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. प्लानची वैधता ३०० दिवसांची आहे. परंतु, फ्री सुविधा सुरुवातीला ६० दिवस मिळते. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TPa1WT