Full Width(True/False)

लाँचच्या आधीच Samsung Galaxy Buds 2 चे स्पेसिफिकेशन्स लीक, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्ली : सॅमसंगचे अपकमिंग इयरबड्स च्या लाँचिंगची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सॅमसंगचे हे इयरबड्स ११ ऑगस्टला होणाऱ्या Galaxy Unpacked इव्हेंटमध्ये लाँच होणार आहेत. मात्र, त्याआधीच याची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहे. या इयरबड्ससोबतच आणि सारखे व Samsung Galaxy Watch 4 Series स्मार्टवॉच देखील लाँच होईल. वाचाः किंमत किती ? लाँचिंगच्या आधीच गॅलेक्सी बड्स २ ची यूरोपियन देशातील किंमतीची खुलासा झाला आहे. सॅमसंग गॅलेक्सी बड्स २ ला यूरोपमध्ये १७२.९ यूरो (जवळपास १५,२६१.१६ रुपये) किंमतीत लाँच केले जाईल. याआधी समोर आलेल्या रिपोर्टमध्ये या बड्सला १५० यूरोमध्ये लाँच केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. सॅमसंगचे हे शानदार इयरबड्स ब्लॅक, व्हाइट, ग्रीन आणि वायलेट रंगात लाँच होऊ शकतात. यामध्ये एकापेक्षा एक दमदार फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये Active Noise Cancellation सपोर्ट देखील मिळू शकतो. Samsung Galaxy Buds 2 च्या संभाव्य वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर यामध्ये साउंड क्वालिडी शानदार असेल. याचे बड्स देखील सहज कानात फिट बसतील व कंफर्टेबल असतील. सॅमसंगचे हे इयरबड्स वॉटर रेसिस्टेंट असतील. बड्समध्ये १२० एमएएच आणि चार्जिंग केसमध्ये ५०० एमएएचची बॅटरी मिळू शकते. लूक आणि फीचर्समुळे याची टक्कर Apple AirPods Pro सोबत असेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3C6HAF1