Full Width(True/False)

Corona Vaccine चे दोन्ही डोस घेतले असतील तर, PVR Cinemas ची ही भन्नाट ऑफर तुमच्यासाठीच, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: जर तुम्ही Covid-19 लशींचे दोन्ही डोस घेतले असतील तर तुमच्यासाठी एक भन्नाट ऑफर आहे. दोन्ही डोस घेणाऱ्यांना आता मोफत चित्रपट तिकिटे मिळू शकतात. सिनेमातर्फे अशीच एक उत्तम ऑफर जाहीर करण्यात आली आहे. या "जेएबी" ऑफर अंतर्गत तुम्ही चित्रपटाचे तिकीट पूर्णपणे मोफत मिळवू शकता. अधिकाधिक लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. वाचा: करोना लसीकरण, Covid-19 संसर्गापासून तर तुमचे संरक्षण करेलच. पण, यामुळे तुम्हाला मोफत तिकिटे मिळतील आणि ते सुद्धा तुमच्या जवळच्या PVR थिएटरमध्ये. कंपनीच्या मते, ही ऑफर लसीकरण केलेल्या गेस्टला अतिरिक्त तिकिटे मोफत (BOGO) प्रदान करेल. विनामूल्य तिकीट व्यतिरिक्त, लसीकरण केलेल्या लोकांना पहिल्या दोन आठवड्यांत पुन्हा दुसरा पॉपकॉर्न टब खरेदी केल्यावर विनामूल्य पॉपकॉर्न मिळेल. कोविड -१९ लसीचे दोन शॉट्स घेतल्यावर असे ऑफर्स मिळतील याची कदाचित कुणी कल्पना केली नसेल. ऑफर १२ ऑगस्ट पर्यंत PVR jab ऑफर १२ ऑगस्ट २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही ऑफर तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरी वगळता सर्व चित्रपट आणि सर्व सिनेमा हॉलवर लागू आहे जिथे PVR उघडण्याची परवानगी आहे. नवीन ग्राहकांसाठी ऑफर व्यतिरिक्त, पीव्हीआरचा विशेषाधिकार आपल्या ग्राहकांना तिकीट आणि खाण्यावर खर्च करून 2X गुण मिळवण्याची संधी देखील देत आहे. ही ऑफर कोणत्याही भाषेच्या, शैलीच्या सर्व चित्रपटांवर वैध आहे. चित्रपट पाहणाऱ्यांना दुसऱ्या तिकिटावरही १५० रुपयांपर्यंत सूट मिळेल. ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे. जर तुम्हाला मोफत तिकिटे मिळवायची असतील तर, तुम्ही BookMyShow व्यतिरिक्त PVR वेबसाइट, मोबाईल अॅप आणि सिनेमावर तुमचे तिकीट बुक करू शकता. PVR ने ३० जुलैपासून त्या राज्यांमध्ये काम पुन्हा सुरू केले. ज्यांनी सिनेमागृहे उघडण्याची परवानगी दिली होती. कंपनीने घोषित केले होते की, कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे कोविड -१९ चे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fAsuxV