मुंबई- गोकुळाष्टमी म्हणजे गोकुळात खेळणाऱ्या खोडकर कान्हाचा जन्मदिवस. संपूर्ण भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कृष्ण म्हटलं की त्याच्यासोबत त्याचे सवंगडी आले. गोपिकांना छेडणारा, दह्यादुधाचा काला करणारा हा कृष्ण प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवला तो छोट्या पडद्यावरील काही कलाकारांनी. कृष्णाचं रूप घेऊन प्रेक्षकांना भेटायला येणाऱ्या या कलाकारांनी प्रेक्षकांना कृष्णावर प्रेम करायला भाग पाडलं. पडद्यावर साकारलेल्या या कृष्णाच्या भूमिकेने देखील या कलाकरांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. चला तर मग पाहुयात कोण होते ते कलाकार. १. सर्वदमन डी बॅनर्जी रामानंद सागर यांच्या प्रचंड गाजलेल्या '' या मालिकेत सर्वदमन यांनी कृष्णाची भूमिका साकारली होती. कार्यक्रमाप्रमाणे सर्वदमन यांनाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. २. छोट्या पडद्यावर कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांमध्ये नितीश भारद्वाज यांना सगळ्यात जास्त लोकप्रियता मिळाली. बी.आर. चोप्रा यांच्या 'महाभारत' या कार्यक्रमात नितीश यांनी कृष्णाची भूमिका साकारली होती. ३. सौरभ राज जैन 'उतरन', 'चंद्रगुप्त मौर्य' यांसारख्या कार्यक्रमात भूमिका करणारा अभिनेता सौरभ राज जैन याने २०१३ साली आलेल्या 'महाभारत' या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारली होती. आजही सौरभ या भूमिकेसाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. ४. विशाल करवाल 'द्वारकाधीश- भगवान श्री कृष्ण', 'नागार्जुन- एक योद्धा' आणि 'परमावतार श्री कृष्ण' या मालिकांमध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारणारा अभिनेता विशाल करवाल देखील प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता. ५. मराठी अभिनेता सुमेध मुदगलकर 'राधाकृष्ण' मालिकेत साकारलेल्या कृष्णाच्या भूमिकेसाठी प्रचंड लोकप्रिय आहे. सुमेधच्या अभिनयाने त्याने प्रेक्षकांना कृष्णाचं वेड लावलं. सुमेधचे मालिकेमधील अनेक संवाद आणि व्हिडीओ आजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ६. स्वप्नील जोशी लोकप्रिय मराठी अभिनेता स्वप्नील जोशी याने वयाच्या नवव्या वर्षी रामानंद सागर यांच्या 'कृष्णा' कार्यक्रमात श्रीकृष्णाच्या बालपणीची भूमिका साकारली होती. स्वप्निलच्या त्या भूमिकेचा आजही प्रेक्षकांना विसर पडलेला नाही.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3DuokC3