Full Width(True/False)

अरे हा तर मुंबईचा वडापाव! प्रभासचा फोटो पाहून बसला धक्का

मुंबई- 'बाहुबली' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेला लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता बॉलिवूड प्रेक्षकांचाही तितकाच लाडका आहे. प्रभासने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली. कित्येक चाहते त्याच्या लुकवर फिदा आहेत. परंतु, सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रभासच्या फोटोंमुळे चाहत्यांची झोप उडाली आहे. या फोटोंमध्ये दिसणारा प्रभास खरंच प्रभास आहे का, असा प्रश्न नेटकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आणि नेटकऱ्यांनी प्रभासची तुलना मुंबईच्या वडापावसोबत केली. सध्या प्रभास त्याचा आगामी चित्रपट 'आदिपुरुष' मुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. प्रभास चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या दरम्यान, मुंबईतील काही फोटोग्राफर्सनी प्रभासचे मेकअप नसतानाचे फोटो काढले. या फोटोंमध्ये प्रभास खूप वेगळा दिसत असल्याने हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल झालेत. फोटोंमधील व्यक्ती प्रभासप्रमाणे दिसतोय परंतु, त्याचा डॅशिंग लुक आणि तेज मात्र प्रभासच्या चेहऱ्यावरून गायब आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी प्रभासला ट्रोल करायला सुरुवात केली. काहींनी प्रभासची तुलना मुंबईच्या वडापावसोबत केली तर काहींनी हा खरंच प्रभास आहे ना, असा प्रश्न उपस्थित केला. काहींनी प्रभासला काका म्हटलंय तर काहींनी बिना मेकअप हे किती वेगळे दिसतात असं म्हटलं आहे. पण दुसरीकडे प्रभासच्या चाहत्यांना हे सहन झालेलं नाही. प्रभासचे चाहतेही त्याच्या बचावासाठी पुढे सरसावले आणि त्याला ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं. ट्रोल करणाऱ्यांसोबत त्यांनी फोटोग्राफर्सना देखील चांगले फोटो घेण्याची विनंती केली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3yrRZbr