नवी दिल्ली: Google चा Pixel 5a स्मार्टफोनने बाजारात एंट्री केली असून २६ ऑगस्टपासून अमेरिका आणि जपानमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अमेरिकेत फोनची किंमत $ ४४९ म्हणजे सुमारे ३३,००० रुपये आहे. ही किंमत पिक्सेल ४ ए च्या लाँचच्या किंमतीच्या आसपास आहे. पिक्सेल ४ ए जेव्हा लाँच करण्यात आला तेव्हा भारतीय किंमतीनुसार त्याची किंमत ३१,९९९ रुपये होती. वाचा: ची वैशिष्ट्ये: हे डिव्हाइस 5G सपोर्टसह येते आणि जुन्या मिड-रेंज Google डिव्हाइसेसच्या तुलनेत त्यात काही नवीन अपडेट्स सादर करण्यात आले आहेत. यात IP67 रेटिंग आहे जे पाणी प्रतिरोधक आहे. स्क्रीनच्या आकाराबद्दल बोलायचे तर, यात ६.३४ -इंच डिस्प्ले आहे, जो गुगल पिक्सेल ४ ए पेक्षा थोडा मोठा असून डिस्प्ले ६.३४ इंच इतका आहे . Google Pixel 5a चा ६०Hz रिफ्रेश रेट आहे. तसेच, यात ४६८० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन सर्व नवीन एक्स्ट्रीम बॅटरी सेव्हर मोडसह येतो. Google Pixel 5a स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७६५ जी प्रोसेसर आणि ६ जीबी रॅमने सुसज्ज असून यात १२८ जीबी स्टोरेज आहे. १२.२ मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर आणि १६ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड असलेला दुसरा सेन्सर तर ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे. फोनमध्ये फिजिकल फिंगरप्रिंट सेन्सर आहे जो फोनच्या बॅक पॅनलवर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड ११ वर काम करतो. हे तीन वर्षांच्या सॉफ्टवेअर अपडेट्सच्या दाव्यासह दिले जाते. यात गुगलचे टायटन एम सिक्युरिटी मॉड्यूल आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये वाय-फाय 802.11a/b/g/n/ac, GPS, GLONASS, ब्लूटूथ 5.0 आणि NFC सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. Google Pixel 5a बहुतेक काळ्या रंगातच लाँच करण्यात आला आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ARuSIR