Full Width(True/False)

iPhone 12 वर मिळतोय आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट, किंमत ऐकून तुम्हीही खूश व्हाल

नवी दिल्लीः जर तुम्हाला नवीन आयफोन खरेदी करायचा असेल तर विजय सेल्सकडे आयफोन सीरीज, आयफोन ११ आणि आयफोन एक्सआर वर काही जबरदस्त ऑफर दिले जात आहे. केवळ आयफोन्सवर नव्हे तर रिटेलर iPad मॉडल, MacBooks, Apple Watch मॉडल, AirPods मॉडल आणि HomePods वर सुद्धा सूट दिली जात आहे. नवीन Apple प्रोडक्ट खरेदी करायचे असेल तर विजय सेल्समधून ऑनलाइन किंवा ऑफलाइन स्टोरवरून खरेदी करू शकता. हायलाइट करण्यात आलेल्या आयफोन १२ ची किंमत ६७ हजार ४०० रुपये आहे. वाचाः मॅकबुक प्रोवर मोठा डिस्काउंट विजय सेल्स अॅप्पल डेज मध्ये एचडीएफसी बँक कार्डचा वापर केल्यास सूट मिळते. क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा उपयोग करून जास्तीत जासत ७ हजार रुपयांची सूट मिळते. हे मॅकबुक प्रोवर आहे. याची किंमत १ लाख १४ हजार रुपये आहे. सूट नंतर हे १ लाख ७ हजार रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता. मॅकबुक प्रो आणि मॅकबुक एयर दोन्ही सोबत अॅपल केयर प्लस खरेदी केल्यास १५ टक्के सूट मिळते. Apple Days सेल आता लाइव्ह आहे. ९ ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे. वाचाः वर ऑफर्स iPhone 12 64GB ला ७३ हजार ४०० रुपयांत खरेदी करू शकता. परंतु, फोनला HDFC बँक कार्ड वरून खरेदी केल्यास हा फोन तुम्हाला ६ हजारांच्या डिस्काउंट सोबत खरेदी करता येईल. म्हणजेच हा फोन ६७ हजार ४०० रुपयात खरेदी करू शकता. हे क्रेडिट आणि डेबिट कार्ड दोन्हीसाठी आहे. iPhone 12 नुकताच Amazon Prime Day सेल मध्ये ६७ हजार ९९९ रुपयात उपलब्ध होता. त्यामुळे विजय सेल्सची ही ऑफर अधिक चांगली वाटते. वाचाः बाकीच्या आयफोन्सवर सुद्धा ऑफर्स विजय सेल्स अॅपल डेज सेल मध्ये अन्य iPhone मध्ये iPhone 12 मिनी ६ हजारांच्या कॅशबॅक सोबत ५७ हजार ४९९ रुपयात मिळत आहे. iPhone 12 प्रो ५ हजारांच्या सूट सोबत १ लाख ४ हजार ९०० रुपयांत मिळत आहे. iPhone 12 प्रो मॅक्स ५ हजार रुपयांच्या डिस्काउंट सोबत १ हजार १४ हजार ९९९ रुपयात मिळत आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WUCj3l