Full Width(True/False)

प्रतीक्षा संपणार ! सप्टेंबरमध्ये एन्ट्री करणार iPhone 13, Pixel 6 आणि Galaxy S21 FE , पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: सप्टेंबर हा स्मार्टफोन प्रेमींसाठी अतिशय रोमांचक महिना असणार आहे. कारण, ज्यांची युजर्स आतुरतेने वाट पाहत आहेत ते iPhone 13, Pixel 6, पुढील महिन्यात लाँच होऊ शकतात. उद्योगातील आघाडीच्या कंपन्या आणि सॅमसंग लाँच करण्यासाठी बहुप्रतिक्षित उत्पादने तयार आहेत. याशिवाय, काही वर्षांपासून फ्लॅगशिप स्मार्टफोन सेगमेंटमधून बाहेर पडलेले गुगल आता फ्लॅगशिप स्पेसिफिकेशन्ससह आपला आणि Pixel 6 Pro लाँच करण्याच्या तयारीत आहे. सप्टेंबर महिन्यात Series सीरीज, Pixel 6 लाइनअप तसेच Galaxy S21 FE च्या रूपात वॉटरड-डाउन Galaxy S21 लाँच होऊ शकतात. वाचा: हे तीन टॉप स्मार्टफोन सप्टेंबर महिन्यात लाँच होण्याची अपेक्षा आहे: Apple iPhone 13 : मीडिया रिपोर्टनुसार, कंपनी १७ सप्टेंबरला ही मालिका लाँच करू शकते. Apple iPhone 13 हा अलीकडच्या काळात सर्वात रोमांचक स्लॅब फोन म्हणून पाहिला जात आहे. यामध्ये तुम्हाला १२० Hz हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले मिळेल. माहितीनुसार, सुरक्षेसाठी, तुम्ही इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस आयडीची सुविधा देखील मिळवू शकता. काही अहवालांनुसार, iPhone 13 मध्ये तुम्हाला एक चांगली कॅमेरा प्रणाली मिळेल, जे व्हिडिओमधील पार्श्वभूमी अस्पष्ट करण्यासाठी व्हिडिओ पोर्ट्रेट मोडला समर्थन देईल. iPhone 13 Pro सीरीजमध्ये एक मोठा कॅमेरा मॉड्यूल आणि iPhone 13 आणि iPhone 13 Mini च्या दुहेरी कॅमेरा संरेखनात बदल पाहायला मिळू शकतो. Reports या वर्षी चार आयफोन लाँच करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कंपनी iPhone 13 mini, iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max ची घोषणा करू शकते. Google Pixel 6 : एका वर्षापेक्षा अधिक काळानंतर Google पुन्हा एकदा फ्लॅगशिप स्मार्टफोन क्षेत्रात प्रवेश करत आहे. कंपनीने आधीच त्याच्या आगामी ऑफरचे प्रदर्शन केले आहे. Google Pixel 6 आणि Pixel 6 Pro ला एक नवीन डिझाइन मिळेल ज्यात कॅमेरा मॉड्यूल आणि मागील बाजूस ड्युअल टोन फिनिश असेल. वैशिष्ट्यांच्या दृष्टीने, हे स्मार्टफोन Google च्या स्वतःच्या Tensor चिपद्वारे समर्थित असतील, ज्यात अतिरिक्त AI प्रक्रिया समाविष्ट आहे. हे देखील समोर आले आहे की ते Pixel 6 मालिकेला चांगल्या प्रतिमा प्रक्रियेस मदत करेल. Google आपल्या आगामी फोनमध्ये नवीन इमेज सेन्सर आणि उत्तम इमेज प्रोसेसिंग ऑफर करत आहे? काही अहवालांनुसार, Google Pixel 6 मालिका iPhone 13 (संभाव्य प्रक्षेपण तारीख) च्या लाँच होण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच १३ सप्टेंबर रोजी लाँच केली जाईल. Galaxy S21 FE : गेल्या काही दिवसांपासून चा उल्लेख वारंवार केला जात Galaxy S21 FEआहे. पुरवठ्याअभावी स्मार्टफोनची ऑर्डर रद्द करण्यात आल्याचेही मीडिया रिपोर्ट्स आले होते. पण, अलीकडेच लीक झालेल्या काही माहितीवरून समोर आले आहे की, Samsung Galaxy S21 FE लवकरच लाँच होणार आहे. या डिव्हाइसमध्ये अनेक खास वैशिष्ट्य पाहायला मिळतील. Galaxy S21 FE स्मार्टफोन ८ सप्टेंबर रोजी लाँच होण्याची शक्यता आहे. Samsung Galaxy S21 FE मध्ये ६.४ इंच डिस्प्ले, सुधारित ३२ एमपी कॅमेरासह ट्रिपल रियर कॅमेरे, फास्ट चार्जिंग आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर सारखी वैशिष्ट्ये असल्याचे सांगितले जात आहे.मात्र, त्याची किंमत काय असेल? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jwNBnq