Full Width(True/False)

Reliance Jio चा हा 'सीक्रेट' प्लान माहितेय का ? यात १९९ रुपयांमध्ये महिनाभर अनलिमिटेड कॉल आणि २५ GB डेटा, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: रिलायन्स जिओने आपले पोस्टपेड ग्राहक वाढवण्यासाठी गेल्या वर्षी JioPostPaid Plus सेवा सुरू केली. या सेवेअंतर्गत कंपनीने पाच प्लान्स सादर केले आहेत ज्यांची किंमत ३९९ रुपयांपासून सुरू होते. पण यापूर्वी कंपनीने पोस्टपेड ग्राहकांसाठी फक्त १९९ रुपयांचा प्लान होता. या प्लानमुळे पोस्टपेड ग्राहक एका महिन्यासाठी जिओ पोस्टपेड सेवेचा लाभ घेऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला जिओच्या १९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लानबद्दल सर्व काही सांगणार आहोत. वाचा: रिलायन्स जिओचा १९९ रुपयांचा प्लान जिओचा १९९ रुपयांचा प्लान एका बिल सायकलची वैधता देते. हे बिल सायकल २८ दिवसांचे आहे. या प्लानमध्ये कंपनी २५ जीबी हायस्पीड डेटा देते. हा डेटा संपल्यानंतर ग्राहकांकडून प्रति जीबी २० रुपये आकारले जातात. व्हॉईस कॉलबद्दल बोलायचे झाले तर, या पोस्टपेड प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल दिले जातात. याशिवाय दररोज १०० एसएमएस देखील मोफत उपलब्ध आहेत. ग्राहकांना अॅप्स अर्थात जिओ टीव्ही, जिओसिनेमा, जिओ न्यूज, जिओसुरिटी आणि जियोक्लाउड सारख्या अॅप्सची मोफत सदस्यता मिळते. जिओकडे १९९ रुपयांचे प्रीपेड पॅक देखील आहे जे बेस्टसेलर श्रेणीमध्ये येते. कंपनीच्या या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे आणि त्यात ४२ जीबी हायस्पीड डेटा उपलब्ध आहे. या प्लानमध्ये दररोज अमर्यादित कॉल आणि १०० एसएमएस उपलब्ध आहेत. ग्राहक दररोज १.५ जीबी डेटा वापरू शकतात. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mJHvlu