Full Width(True/False)

iPhone खरेदीवर अशी जबरदस्त डील पहिल्यांदाच ! आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत खरेदी करा iPhone 12 , पाहा ऑफर्स

नवी दिल्ली: जर तुम्ही iPhone खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमचे हे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते. सध्या दररोज, Apple iPhone च्या विविध मॉडेल्सवर ई-कॉमर्स वेबसाईटवर उत्तम डील्स देण्यात येत असून सध्या लाँच किमतीपेक्षा १८ हजार रुपये कमी किंमतीत तुम्हाला खरेदी करता येणार आहे. सध्या एक्सचेंज ऑफरसह iPhone 12 ६४ जीबी व्हेरिएंटसाठी आतापर्यंतची सर्वात कमी किंमत ६१,९९० रुपये आहे. ग्राहकांना ३,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील दिला जात आहे. याशिवाय, बँक ऑफरसह सूट देखील उपलब्ध असेल. वाचा: अलीकडेच iPhone 12 Mini अॅमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल आणि फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल मध्ये ५८,९०० रुपयांच्या सर्वात कमी किंमतीत उपलब्ध होता. तसेच, iPhone 12 या सेलमध्ये ६७,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. म्हणजेच, ६१,९०० रुपयांच्या सध्याच्या प्रभावी किंमतीसह मिळणारी ही एक जबरदस्त डील आहे. iPhone 12: ऑफर iPhone 12 च्या MRP बद्दल बोलायचे झाले तर, ती ७९,९०० रुपये आहे. तुम्ही एचडीएफसी बँक कार्डसह आयसोर किंवा ऑफलाइन रिटेलरकडून फोन घेतला तर तुम्हाला ६ हजार रुपयांचा कॅशबॅक मिळेल. याशिवाय, जुन्या स्मार्टफोनसाठी जास्तीत जास्त ९,००० रुपये आणि ३,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळू शकतो. iPhone 7 च्या १२८ जीबी व्हेरिएंटला ९ हजार एक्सचेंज मूल्य मिळेल. इंडिया iStore ने या ऑफरसाठी कोणतीही वैधता माहिती दिलेली नाही. Apple पुढच्या महिन्यात नवीन iPhone 13 सीरीज लाँच करण्याची शक्यता आहे. इंडिया iStore ने वर्तमानपत्रांमध्ये पूर्ण फुल पेज जाहिरातीद्वारे या ऑफरबद्दल माहिती दिली आहे. जाहिरातीमध्ये म्हटले आहे, 'हा स्वातंत्र्यदिन iPhone 12 सह साजरा करा'. एक्सचेंजसह प्रभावी किंमत ६१,९०० रुपये इतकी असेल. ही ऑफर iPhone 12 Pro मॉडेलवर देखील लागू आहे. iPhone 12 चे १२८ जीबी मॉडेल एक्सचेंज ऑफरसह १,०२,९०० रुपयांच्या आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत मिळू शकते. यासह ३००० रुपयांचा अतिरिक्त एक्सचेंज बोनस नाही. त्याचप्रमाणे, iPhone 12 Pro Max चे १२८ जीबी व्हेरिएंट देखील या एक्सचेंज ऑफर अंतर्गत १, १२,९०० रुपयांना मिळू शकते. iPhone 12 Mini चे ६४ जीबी वेरिएंट ५१,९०० रुपयांच्या एक्सचेंज ऑफरसह मिळू शकते. iPhone 11 ऑफलाइन रीसेलर्सकडून एक्सचेंज ऑफरसह ३७,९०० रुपयांना खरेदी करता येईल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fRbsM7