नवी दिल्लीः दिग्गज टेलीकॉम कंपनी वोडाफोन-आयडिया ने आपल्या ग्राहकांना जबरदस्त भेट दिली आहे. कंपनीने आपल्या तीन प्रीपेड प्लान सोबत ZEE5 Premium ची मेंबरशीप फ्री देण्याची घोषणा केली आहे. या प्रीपेड प्लानमध्ये २९९ रुपये, ४४९ रुपये, ६९९ रुपयाचे आहे. या तीन प्लानमध्ये रोज ४ जीबी डेटा मिळतो. तसेच एक वर्षांपर्यंत झी ५ ची मेंबरशीप मिळते. या मेंबरशीपची किंमत ४९९ रुपये आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार, Zee5 Premium मेंबरशीपला ३० ऑगस्ट आधी घेता येवू शकते. वाचाः Vi चा २९९ रुपयांचा प्लान हा कंपनीचा सर्वात स्वस्त रोज ४ जीबी डेटा प्लान आहे. या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता मिळते. या प्रमाणे ग्राहकांना एकूण ११२ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस मिळते. अन्य सुविधेत फ्री नाइट डेटा, विकेंड डेटा रोलओवर आणि Vi Movies & TV Classic अॅक्सेस सोबत आता १ वर्षासाठी Zee5 premium चे अॅक्सेस मिळते. वाचाः Vi चा ४४९ रुपयांचा प्लान हा प्लान ५६ दिवसांच्या वैधते सोबत येतो. ज्यात रोज ४ जीबी डेटा दिला जात आहे. म्हणजेच यात एकूण २२४ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० फ्री एसएमएस दिले जाते. याशिवाय, बिंज ऑल नाइट, Vi Movies आणि TV क्लासिक्सचे फ्री अॅक्सेस आणि विकेंड डेटा रोलओवरची सुविधा मिळते. या प्लानमध्ये एक वर्षासाठी Zee5 premium चे अॅक्सेस मिळते. वाचाः Vi चा ६९९ रुपयांचा प्लान एक वर्षासाठी Zee5 premium चे अॅक्सेस सोबत येणारा हा कंपनीचा तिसरा प्लान आहे. ६९९ रुपयांच्या रिचार्ज प्लान मध्ये युजर्संना रोज ४ जीबी डेटा सोबत ८४ दिवसांची वैधता मिळते. प्लानमध्ये देशात कुठेही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० SMS पाठवण्याची सुविधा दिली जाते. याशिवाय, या प्लानमध्ये बिंज ऑल नाइट, Vi Movies आणि TV क्लासिक्सचे फ्री अॅक्सेस आणि विकेंड डेटा रोलओवरची सुविधा मिळते. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lLZuqP