Full Width(True/False)

itel A48 बजेट किंमतीत लवकरच होऊ शकतो भारतात लाँच, Jio युजर्सना मिळणार विशेष फायदे, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: itel लवकरच चे रिलोडेड एडिशन भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. itelने पूर्वी केलेल्या इतर सर्व भागीदारींद्वारे, कंपनी नेहमीच डिजिटल इंडियाकडे वाटचाल करत आहे. कंपनीला नवीन स्मार्टफोन रेंजद्वारे परवडणारे बनवायचे आहे. गेल्या काही काळात स्मार्टफोन भारताच्या ग्रामीण भागासाठी एक लक्झरी वस्तू बनली आहे. भारतातील ग्रामीण भागातील युवकांसाठी ऑनलाईन शिक्षण, आर्थिक व्यवहार आणि मनोरंजनाचे एकमेव साधन स्मार्टफोन आहे आणि ग्रामीण भागात अशी सुविधा देण्यासाठी itel हा नवीन फोन लाँच करणार आहे. वाचा: Itel A48 : वैशिष्ट्ये यात २.५ D TP लेन्ससह ६.१ इंचाचा HD + IPS वॉटरड्रॉप डिस्प्ले दिला जाऊ शकतो. त्याचा आस्पेक्ट रेशियो १९:५:९ आहे आणि पिक्सेल रिझोल्यूशन १५७०x७२०. यामुळे या फोनचे इमर्सिव आणि सिनेमॅटिक व्ह्यू सुधारणार या वैशिष्ट्यांसह, फोनची स्क्रीन अधिक चांगला अनुभव देईल. हे डिव्हाईस Android १० (Go Edition) सह येऊ शकते. यात २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे १२८ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ड्युअल ५ मेगापिक्सलचा एएफ रियर कॅमेरा आहे. यामध्ये ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. हे एक अद्वितीय कॅमेरा सेटअपसह कॉन्फिगर केले आहे. काउंटरपॉईंटच्या अहवालानुसार, itel ने सलग दोन तिमाही म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत ६,००० स्मार्टफोन विभागात क्रमांक १ चे स्थान मिळवले होते. तसेच, कंपनीचे भारतात ७० दशलक्षाहून अधिक ग्राहक आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AwgYLV