Full Width(True/False)

प्रतिक्षा संपणार! Motorola ला १७ ऑगस्टला भारतात लाँच करणार ‘हा’ शानदार स्मार्टफोन

नवी दिल्ली : गेल्याकाही दिवसांपासून सीरिज चर्चेत आहे. ही सीरिज भारतात कधी लाँच होणार याची अनेकजण प्रतिक्षा करत आहेत. मात्र, आता याबाबतची माहिती समोर आली असून, ई-कॉमर्स वेबसाइट वर Edge 20 साठी एक माक्रोवेबसाइट बनवण्यात आली आहे. यानुसार, फोनला भारतात १७ ऑगस्टला १२ वाजता लाँच केले जाईल. या साइटवर च्या अनेक फीचर्सची माहिती देण्यात आली आहे. वाचा: Motorola Edge 20 चे फीचर्स Flipkart वर देण्यात आलेल्या माहितीनुसार, यात अनेक दमदार फीचर्स मिळतील. कंपनीनुसार, हा भारतातील सर्वात पातळ ५जी असेल. हा फोन ६.९९एमएम पातळ असेल. फीचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात १४४ हर्ट्ज HDR10+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा अल्ट्रा स्मूथ डिस्प्ले असेल. यात ५७६ हर्ट्ज टच सँपलिंग रेट असेल. हा भारतातील पहिला फोन असेल जो ११ ५जी बँड्ससह स्नॅपड्रॅगन ७७८जी सोबत येईल. यात ८ जीबी रॅम देण्यात आली असून, अल्ट्रा-फास्ट परफॉर्मेंस मिळेल. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. याचा प्रायमरी सेंसर १०८ मेगापिक्सल आहे, जो हाय-रिझॉल्यूशन सेंसरसह येतो. दुसरा १६ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा+मॅक्रो व्हिजन आहे. तिसरा ८ मेगापिक्सलचा ३एक्स टेलिफोटो लेंस आहे, जी OIS सोबत येते. यात प्रोटेक्शनसाठी ThinkShield देण्यात आले आहे. या फोनला निअर-स्टॉक अँड्राइड ११ सोबत सादर केले जाईल. यामध्ये यूजर्सला अ‍ॅड-फ्री आणि ब्लॉटवेअर फ्री अनुभव मिळेल. Flipkart वरील पेजमध्ये केवळ Motorola Edge 20 च्या लाँचिंगची माहिती मिळत आहे. या सीरिजमधील इतर फोन्स भारतात कधी लाँच होणार आहेत याची माहिती देण्यात आलेली नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2X4Njeq