Full Width(True/False)

कमी किंमतीत जबरदस्त फीचर्सचा itel A48 स्मार्टफोन भारतात लाँच, जिओ युजर्संना मिळणार ४ हजारांपर्यंत फायदा

नवी दिल्लीः itel ने भारतात आपला नवीन Reloaded All Rounder स्मार्टफोन- ला लाँच केले आहे. कंपनीचा हा फोन २ जीबी रॅम आणि वॉटरड्रॉप डिस्प्ले डिजाइन सोबत येणारा देशातील पहिला सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. कंपनीने A48 स्मार्टफोनची किंमत ६ हजार ३९९ रुपये ठेवली आहे. याची विक्री सुरू करण्यात आली आहे. जर तुम्हाला हा फोन जिओ एक्सक्लूसिव्ह ऑफरसाठा एनरॉल करायचा असेल तर तुम्हाला ५१२ रुपयांचे इंस्टेंट प्राइसचा सपोर्ट मिळेल. तसेच सोबत कंपनी युजर्संना ४ हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त बेनिफिट्स देत आहे. वाचा: itel A48 चे फीचर आणि स्पेसिफिकेशन फोनमध्ये 720x1560 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.१ इंचाचा एचडी प्लस IPS वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिला आहे. हा फोन 19.5:9 च्या आस्पेक्ट रेशियो सोबत येतो. २ जीबी रॅम आणि ३२ जीबीचे इंटरनल स्टोरेज दिले आहे. या फोनमध्ये 1.4Ghz चे क्वॉड-कोर प्रोसेसर दिले आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ५ मेगापिक्सलचा ड्युअल ऑटोफोकस कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये AI Beauty मोड सोबत ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचा: ड्युअल सिम स्लॉट आणि १२८ जीबी पर्यंत मायक्रो एसडी कार्डचे सपोर्ट करणाऱ्या या फोनमध्ये 3000mAh ची बॅटरी दिली आहे. हा फोन अँड्रॉयड १० गो एडिशनवर काम करतो. फेस अनलॉक आणि मल्टी फिंगरप्रिंट सेन्सर दिलेल्या या फोनमध्ये ग्रेडियंट ग्रीन, ग्रेडियंट पर्पल आणि ग्रेडियंट ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये आणले आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yZEhNQ