Full Width(True/False)

७००० mAh बॅटरीसह आज भारतात लाँच होणार Tecno Pova 2, जाणून घ्या किंमत-फीचर्स

नवी दिल्ली: बजेट स्मार्टफोन चाहत्यांसाठी एक चंगली बातमी आहे. आज भारतीय बाजारात लाँच करण्यात येणार असून हे डिव्हाईस केवळ ई-कॉमर्स वेबसाईट Amazon वर उपलब्ध करून दिले जाईल. येथे फोनसाठी एक मायक्रोसाइट तयार करण्यात आली आहे, ज्याद्वारे फोनची वैशिष्ट्ये आणि डिझाइनची माहिती उपलब्ध आहे. लिस्टिंग नुसार फोन MediaTek Helio G80 प्रोसेसरसह ऑफर केला जाईल. याशिवाय फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाईल. हा फोन यापूर्वी फिलीपिन्समध्ये लाँच करण्यात आला आहे. डिझाईन बद्दल बोलायचे झाले तर, Tecno Pova 2 मध्ये प्लास्टिक पॅनल देण्यात येईल. तसेच, आयताकृती कॅमेरा मॉड्यूल फोनमध्ये दिला जाऊ शकतो. त्याच वेळी, एक केंद्रीत पंच-होल कॅमेरा दिला जाऊ शकतो. वाचा: Tecno Pova 2 वैशिष्ट्ये : या फोनमध्ये ६.९ इंच IPS LCD डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचे पिक्सेल रिझोल्यूशन १०८०x२४०० असेल . हा फोन MediaTek Helio G80 प्रोसेसरने सुसज्ज असेल. हे ऑक्टा-कोर चिपसेटसह ऑफर केले जाईल जे १२ एनएम उत्पादन प्रक्रियेपासून तयार केले गेले आहे. हा फोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज सह येऊ शकतो. Tecno Pova 2 मध्ये क्वाड रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. Tecno Pova 2 मध्ये ४८ मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर, २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि दोन २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला जाऊ शकतो. सेल्फीसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सेन्सर दिला जाऊ शकतो. Tecno Pova 2 मध्ये ७००० mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते, जी १८ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हे डिव्हाईस Android ११ वर आधारित HiOS ७.६ वर काम करेल. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ ५.०, जीपीएस, टाइप-सी आणि ३.५ एमएम जॅकसारखे फीचर्स दिले जाऊ शकतात. फोनच्या किंमतीबद्धल सध्या तरी माहिती उपलब्ध नाही. पण फोनची किंमत १०,००० ते १२,००० रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fhBwj5