नवी दिल्ली : आज भारतीय बाजारात Smart 5A लाँच होणार आहे. या फोनचा टीझर ई-कॉमर्स वेबसाइट वर जारी करण्यात आला होता. फोन विक्रीसाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे. फोनच्या डिझाइन आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल माहिती समोर आली आहे. स्मार्ट ५ए ची बॅटरी, कलर ऑप्शन, वजन आणि सिक्योरिटी लॉक फीचर्सची माहिती फ्लिपकार्ट पेज टीझरवर उपलब्ध करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊया. वाचाः Infinix Smart 5A चे संभाव्य डिटेल्स इनफिनिक्सच्या या फोनमध्ये वॉटरड्रॉप-स्टाइल नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये पॉवर बटन उजव्या बाजूला देण्यात आला आहे. यात स्पीकर ग्रिल, ३.५ एमएम ऑडिओ जॅक आणि चार्जिंग पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. फोनमध्ये रेकटँग्यूलर-शेप्ट कॅमेरा मॉड्यूल आणि ड्यूल रियर सेंसर देखील मिळेल. फोनच्या रेंडर्सवरून लक्षात येते की, यात रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला जाऊ शकतो. फोन ओशियन व्हाइट, मिडनाइट ब्लॅक आणि क्यून्टझल सयना रंगात येईल. मध्ये ६.५२ इंच एचडी+ आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबत ५००० एमएएचची बॅटरी देखील मिळेल. फोनमध्ये १९ तास व्हिडीओ प्लेबॅक, २८ तास म्यूझिक प्लेबॅक, १३ तास गेमिंग टाइम, १६ तास वेब सर्फिंग, ३३ तास ४जी टॉकटाइम आणि ३५ दिवस स्टँडबाय टाइम देण्यास सक्षम असल्याचा दावा करण्यात आला आहे. फोन ८.३एमएम पातळ आणि वजन १८३ ग्रॅम असू शकते. यात फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक सपोर्ट मिळू शकतो. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. यात प्रायमरी सेंसर १३ मेगापिक्सल, दुसरा २ मेगापिक्सल असेल. तिसऱ्या कॅमेऱ्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. याशिवाय मीडियाटेक हीलियो जी२५ प्रोसेसरसह २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज फोनमध्ये मिळू शकते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3A1CXdG