Full Width(True/False)

Motorola Edge 20 :आजपासून सुरू होणार भारतातील सर्वात स्लिम आणि लाईट फोनची प्री-ऑर्डर, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : Motorola Edge 20 आणि काही दिवसांपूर्वीच पूर्वी भारतीय बाजारात लाँच करण्यात आले होते. यापैकी Motorola Edge 20 आज प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, Motorola Edge 20 ची नवीन विक्री तारीख लवकरच जाहीर केली जाईल. Motorola Edge 20 साठी प्री-ऑर्डर आज दुपारी १२ पासून ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर सुरू होईल. वाचा: Motorola Edge 20 किंमत: फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २९,९९९ रुपये आहे. फोन फ्रॉस्टेड पर्ल आणि फ्रॉस्टेड एमराल्ड रंगांमध्ये उपलब्ध असेल. या फोनला भारतातील सर्वात पातळ आणि हलका फोन म्हटले जात आहे. Motorola Edge 20 ची वैशिष्ट्ये: हा फोन MyUX वर आधारित Android ११ वर काम करतो. यात ६.७ इंच फुल HD+ OLED मॅक्स व्हिजन डिस्प्ले आहे. ज्याचे, पिक्सेल रिझोल्यूशन १०८० x२४०० आहे. हा फोन ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ७७८G प्रोसेसर आणि ८ जीबी रॅमने सुसज्ज आहे. यात १२८ जीबी स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याचे प्राथमिक सेन्सर १०८ मेगापिक्सल, दुसरे ८ मेगापिक्सेल आणि तिसरे १६ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ४००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी ३० W टर्बोपावर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी, त्यात 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth v5.2, GPS / A-GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट देण्यात आले आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WbjMjn