Full Width(True/False)

बंपर ऑफर! 'या' दमदार फोनवर तब्बल १४ हजार रुपयांपर्यंतची ऑफर, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : बाजारात असे अनेक स्मार्टफोन्स आहेत जे जबरदस्त फीचर्ससह येतात. यापैकीच एक चा आहे. या फोनची सुरुवाती किंमत २९,९९९ रुपये आहे. यामध्ये क्वालकॉम सनॅपड्रॅगन ८७० प्रोसेसर, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, ४५२० एमएएच बॅटरी, एमोलेड डिस्प्ले सारखे फीचर्स देण्यात आले आहे. कंपनीची अधिकृत वेबसाइट mi.com वर Mi 11X 5G वर तब्बल १४ हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. या स्मार्टफोनवर मिळणाऱ्या किंमत आणि ऑफर्सविषयी जाणून घेऊया. वाचा: Mi 11X 5G ची किंमत या फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३३,९९९ रुपये आहे. ४ हजार रुपये डिस्काउंटनंतर २९,९९९ रुपयात खरेदी करू शकता. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३४,९९९ रुपये आहे. ३ हजार रुपये डिस्काउंटनंतर ३१,९९९ रुपयात खरेदी करू शकता. ऑफर्सबद्दल सांगायचे तर एसबीआय क्रेडिट कार्डचा वापर केल्यास यूजर्सला २ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंट दिले जात आहे. सोबतच, १४ हजार रुपये एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. जुन्या फोनवर पूर्ण एक्सचेंज ऑफर मिळाल्यास फोनला १५,९९९ रुपये आणि १७,९९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनला नो-कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करता येईल. सोबतच, Mi Screen Protect दिले जात असून, जे वर्षातून दोन क्लेम करता येईल. तसेच, एक्सिडेंटल आणि लिक्विड डॅमेजची सुरक्षा देखील मिळेल. यासाठी १,८९९ रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. Mi 11X 5G चे फीचर्स फोनमध्ये ६.६७ इंच फुल एचडी+ ई४ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. फोनमध्ये एचडीआर१०+ सपोर्ट मिळतो. तसेच, ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह ८ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळेल. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी सेंसर ४८ मेगापिक्सलचा सोनी IMX५८२ आहे. दुसरा ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि तिसरा ५ मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आहे. सेल्फीसाठी २० मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. पॉवरसाठी ३३ वॉट फास्ट चार्जिंग आणि वायर्ड रिव्हर्स चार्ज २.५ वॉट सपोर्टसह ४५२० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ५जी, ड्यूल बँड वाय-फाय ६, जीपीएस, ए-जीपीएस, NavIC आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sI9Olg