नवी दिल्ली : सॅमसंगने आपला नवीन स्मार्टफोन ला लाँच केले आहे. हा मार्चमध्ये लाँच करण्यात आलेल्या Galaxy A52 5G चे अपग्रेडेट व्हर्जन आहे. या नवीन स्मार्टफोनला इंप्रूव्हड परफॉर्मेंससाठी शानदार चिपसेटसह सादर करण्यात आले आहे. या फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: चे स्पेसिफिकेशन्स डिस्प्ले आणि सॉफ्टवेअर: या स्मार्टफोनमध्ये ६.५ इंच फुल एचडी+ सुपर एमोलेड इनिफिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आल असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. फोन अँड्राइड ११ आधारित वन यूआय ३ वर काम करतो. प्रोसेसर, रॅम व स्टोरेज: ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७७८जी चिपसेटसह ६ जीबी रॅम देण्यात आली आहे. यामध्ये रॅम प्लस फीचर देण्यात आले आहे. याद्वारे इंटर्नल स्टोरेजचा वापर करून रॅम वाढवता येईल. फोनमध्ये १२८ जीबी स्टोरेज मिळते. स्ट्रोरेजला मायक्रोएसडी कार्डद्वारे १ टीबीपर्यंत वाढवू शकता. कॅमेरा: या स्मार्टफोनमध्ये रियरला तीन कॅमेरे देण्यात आले आहे. यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन सपोर्टसह ६४ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, १२ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड लेंस, ५ मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल टेलिफोटो कॅमेरा सेंसर मिळेल. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. बॅटरी: यात २५ वॉट सुपर फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. बॉक्समध्ये सपोर्टेड चार्जर देखील मिळेल. कनेक्टिव्हिटी: कनेक्टिव्हिटीसाठी यात ५जी, वाय-फाय, ४जी एलटीई, जीपीएस/ए-जीपीएस, ब्लूटूथ, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि एनएफसी सपोर्ट मिळेल. सिक्योरिटीसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळते. अन्य फीचर्स: डस्ट आणि वॉटर रेसिस्टेंससाठी हा फोन आयपी६७ सर्टिफाइड आहे. फोन डॉल्बी एटमॉससह स्टेरिओ स्पीकर्ससह देखील येतो. Galaxy A52s 5G ची किंमत फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत ४०९ GBP (जवळपास ४१,८०० रुपये) आहे. फोन Awesome White, Awesome Black, Awesome Mint आणि Awesome Violet या चार रंगात येतो. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CQUKqd