मुंबई- बॉलिवूड अभिनेता याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोने अरमानची चौकशी करण्यासाठी त्याचा ताबा देण्याची न्यायालयाला विनंती केली होती. ही विनंती मान्य करत न्यायालयाने अरमानला एनसीबीच्या ताब्यात दिलं आहे. यासोबत अंमली पदार्थांची तस्करी करणारा राजू सिंह यालादेखील न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी एनसीबीने धडक कारवाई करत अरमानच्या घरावर छापेमारी केली होती. त्यात अरमानच्या घरात काही प्रमाणात कोकेन आढळलं. त्यानंतर पोलिसांनी अरमानला घरात आढळलेल्या अंमली पदार्थांबाबतीत काही प्रश्न विचारले. परंतु, अरमान पोलिसांच्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तरं देऊ शकला नाही. अरमानवर संशय आल्याने पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली. आज २९ ऑगस्ट रोजी अरमानला न्यायालयासमोर उभं केलं जाणार होतं. सुनावणीत न्यायालयाने अरमानची अधिक चौकशी करण्याचे आदेश देत त्याला एका दिवसाची कोठडी सुनावली. अरमानच्या अटकेनंतर एनसीबीच्या विभाग प्रमुखांनी म्हटलं, 'अरमान कोहलीला आम्ही अटक केली आहे. त्याच्या घरात थोड्या प्रमाणात कोकेन आढळलं आहे. अरमान अंमली पदार्थ विकत होता की नाही आणि या प्रकरणात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे याची चौकशी सध्या सुरू आहे.' जुहू परिसरात एनसीबीने केलेल्या छापेमारीत पोलिसांनी राजू सिंह याला अटक केली होती. त्याच्या चौकशीत अरमानचं नाव समोर आल्याने एनसीबीने ही कारवाई केली.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mPLuga