Full Width(True/False)

बाळाच्या वडिलांच्या नावाचा खुलासा करण्यास नुसरत जहांचा नकार; घेतला मोठा निर्णय

मुंबई- लोकप्रिय बंगाली अभिनेत्री नुसरत जहां अभिनयासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. नुसरतने नुकताच एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. नुसरतच्या चाहत्यांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या. परंतु, यासोबतच नुसरतच्या मुलाचे वडील नक्की कोण असा प्रश्नही अनेक नेटकऱ्यांनी उपस्थित केला. नुसरत गरोदर असल्यापासूनच हा प्रश्न सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला होता. अखेर नुसरतने या प्रश्नावर उत्तर देत मुलाला वडिलांचं नाव देण्यास नकार दिला आहे. ती सिंगल मदर बनून बाळाला सांभाळणार असल्याचं नुसरतने म्हटलं आहे. नुसरतने २०१९ साली तुर्की येथे सोबत विवाह केला होता. परंतु, २०२० मध्ये काही कारणांमुळे ते वेगळे राहू लागले. त्यानंतर नुसरत अभिनेता याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत आहे. नुसरत २०२० मध्ये वेगळी राहू लागल्याने निखिलने या मुलाला आपलं नाव देण्यास नकार दिला होता. तर नुसरतनेही बाळाच्या वडिलांच्या नावाचा खुलासा करण्यास नकार दिला होता. आता नुसरतने मुलाचं नाव ईशान ठेवलं आहे. मात्र मुलाला वडिलांचं नाव देण्यास तिने नकार दिला आहे. नुसरतसोबत लिव्ह इनमध्ये असलेला यश अभिनेत्रीच्या डिलिव्हरीच्या वेळेस हॉस्पिटलमध्ये उपस्थित असल्याने यश या बाळाचा बाबा आहे असा अंदाज नेटकरी लावत आहेत. नुसरतच्या सिंगल मदर बनून मुलाला सांभाळण्याच्या या निर्णयाचं कोलकाता मधील अनेक महिलांनी स्वागत केलं आहे. तर सोशल मीडियावरही नुसरत प्रचंड चर्चेत आहे. काहींनी तिला ट्रोल केलं आहे तर काही युझर्सनी तिला पाठिंबा दर्शवला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3DsYiPB