नवी दिल्लीः काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या स्मार्टफोन मध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. 91मोबाइल्सच्या माहितीनुसार, एका युजरने आपल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये ५ दिवस जुन्या वनप्लस नॉर्ड 2 मध्ये स्फोटो झाल्याचा दावा केला आहे. हा फोन त्या व्यक्तीची पत्नी वापरत होती. व्यक्तीने सांगितले की, स्फोटानंतर फोनमधून धूर निघत होता. या स्फोटात पत्नी गंभीर जखमी झाली आहे. तिला प्रचंड धक्का बसला आहे. बेंगळुरूत राहणाऱ्या अंकुर शर्माने आपल्या ट्विट मध्ये हा दावा केला आहे. वाचाः काय आहे पूर्ण प्रकरण अंकुरने आपल्या ट्विट मध्ये लिहिले की, आज सकाळी ६ वाजता माझी पत्नी आपला वनप्लस नॉर्ड २ (५ दिवसांपूर्वी खरेदी केला होता) फोन घेवून सायकलिंगला गेली होती. तिने हा फोन आपल्या स्लिंग बॅगमध्ये ठेवला होता. अचानक फोनमध्ये ब्लास्ट झाला आणि धूर निघू लागला. या स्फोटोता महिला जखमी झाली असून यानंतर तिला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. वाचाः फोटोत दिसले प्रचंड नुकसान अंकुरने आपल्या ट्विट मध्ये फोनचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत एक फोन प्रचंड जळालेला दिसत आहे. याच्या रियर पॅनेल, फ्रेम आमि डिस्प्ले पूर्णपणे खराब झाला आहे. LetsGoDigital च्या माहितीनुसार, या फोनच्या आतून स्फोट झाला आहे. याआधी या फोनसंबंधीत कोणताही दुर्घटना घडली नाही. हे पहिले प्रकरण आहे. विशेष म्हणजे अंकुरने आपले ट्विट थोड्या वेळानंतर डिलीट केले आहे. वाचाः कंपनीने काय म्हटले कंपनीने या प्रकरणाचा तपास करण्याचे आश्वासन दिले आहे. शर्माच्या ट्विटला उत्तर देताना वनप्लसने लिहिले की, आम्ही आपले अनुभव ऐकून दुःखी आहोत. आम्ही याचा गंभीरपणे विचार केला आहे. आमचे तुम्हाला आवाहन आहे की, डायरेक्ट मेसेजवर संपर्क करा. आम्ही तुमची मदत करण्यास तयार आहोत. कंपनीने अद्याप कोणतेही अधिकृत स्टेटमेंट जारी केले नाही. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WLVkF9