Full Width(True/False)

POCO च्या 'या' लोकप्रिय स्मार्टफोनच्या किमतीत पुन्हा वाढ, फोनमध्ये ६००० mAh बॅटरी, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : चीनची लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी शाओमीने पुन्हा एकदा आपल्या बजेट स्मार्टफोन च्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने तिसऱ्यांदा या स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ केली असून यावेळी त्याची किंमत ५०० रुपयांनी वाढली आहे. वाढीव किंमत फक्त फोनच्या ६ जीबी रॅम व्हेरिएंटवर लागू होईल, तुम्ही दुसरे व्हेरियंट पूर्वी असलेल्या किंमतीत खरेदी करू शकाल. पाहा डिटेल्स. वाचा : ही आहे नवीन किंमत : ४ GB रॅम आणि ६४ GB इंटरनल स्टोरेज असलेल्या M3 व्हेरिएंटची किंमत फक्त १०,४९९ रुपये आहे. त्याच वेळी, तुम्ही त्याचे ६GB रॅम आणि ६४GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट ११,९९९ रुपयांमध्ये घरी आणू शकता, तर त्याच्या ६GB रॅम आणि १२८ GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची नवीन किंमत १२,९९९ रुपये आहे. तुम्ही हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट वरून खरेदी करू शकता. POCO M3 ची वैशिष्ट्ये यात ६.५३ इंच FHD + डिस्प्ले आहे. ज्याचा रीफ्रेश दर ६० Hz आहे. तुम्हाला फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसर मिळेल. POCO M3 Android 10 वर आधारित MIUI १२ सह येतो. फोनला पॉवर देण्यासाठी यात ६००० mAh ची बॅटरी आहे जी १८ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Poco M3 : कॅमेरा Poco M3 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये ४८ एमपी प्राथमिक कॅमेरा, २ एमपी डेप्थ आणि २ एमपी मॅक्रो लेन्स. याशिवाय ८ एमपीचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, ४ जी एलटीई, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ ५.० जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखी वैशिष्ट्ये प्रदान केली गेली आहेत. Realme Narzo 20A सोबत स्पर्धा Poco M3 ची भारतीय बाजारात Realme Narzo 20A सोबत स्पर्धा आहे. या फोनमध्ये तुम्हाला ६.५ इंच HD + डिस्प्ले मिळेल, ज्याचे रिझोल्यूशन ७२०x१६०० पिक्सेल आहे. फोनचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी स्नॅपड्रॅगन ६६५ प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये उत्कृष्ट ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये १२MP प्राथमिक सेन्सर, २MP मोनोक्रोम लेन्स आणि २MP रेट्रो सेन्सरचा तिसरा कॅमेरा आहे. सेल्फीसाठी ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत ९,४९९ रुपये आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jsozFW