Full Width(True/False)

अदिती आणि तुझ्यात काय साम्य आहे? अमृता पवार म्हणते, आम्ही दोघीही...

मुंबई :एक मुलगी एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये लग्न करून गेल्यावर तिची होणारी तारेवरची कसरत '' या नव्या मालिकेत दिसणार आहे. अभिनेत्री यात प्रमुख भूमिका साकारतेय. या भूमिकेविषयी ती म्हणाली, 'या भूमिकेसाठी मला विचारलं तेव्हा मी उत्सुक होते. कारण ही भूमिका मी याआधी साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे. मला शूटिंग करतानादेखील मजा येतेय.' ही भूमिका आणि अमृता यामध्ये काय साम्य आणि फरक आहे असं विचारलं असता ती म्हणाली, 'मालिकेतील अदितीला माणसांची भीती वाटते. त्यामुळे ती एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये किती रुळेल हे सांगता येत नाही. याउलट मला मात्र एकत्र कुटुंबपद्धत खूप आवडते. मला सर्व कुटुंबियांबरोबर वेळ घालवायला, त्यांच्याशी गप्पा मारायला आवडतं. हा एक फरक आहे अदिती आणि अमृतामध्ये. तसंच दोघींमध्ये साम्य असं आहे की, दोघींनी कोणाला आपलं मानलं की त्या व्यक्तीला त्या खूप जीव लावतात.' सध्याच्या काळात एकत्र कुटुंबपद्धत विरळ होताना दिसतेय. याविषयी ती म्हणाली, 'मी एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये वाढलेली नाही. पण मला एकत्र कुटुंबपद्धत खूप आवडते. आम्ही नातेवाईक गणपतीसाठी एकत्र गावी जायचो आणि मिळून तो सण साजरा करायचो. तेव्हा मिळून सगळी तयारी करायचो, सगळ्यांचं जेवण एकत्र व्हायचं आणि त्यानंतर गप्पा रंगायच्या. या आठवणी माझ्या खूप जवळच्या आहेत.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Y90XOl