Full Width(True/False)

Realme Book (Slim) चा पहिला सेल आज, २० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा हा स्टायलिश लॅपटॉप, पाहा ऑफर्स

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी realme ने आपला पहिला लॅपटॉप realme Book (Slim) लाँच केला असून हा लॅपटॉप खूप पातळ आणि हलका आहे. डिव्हाईस केळ १४..९ मिमी पातळ असून त्याचे वजन १.३८ किलो आहे. डिव्हाइस दोन प्रकारांमध्ये येते. प्रथम i3 सह आणि दुसरा i5 सह. त्यांची सुरुवातीची किंमत ४४,९९९ रुपये आहे. realme Book (Slim) मध्ये १४ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचा एक प्रकार प्रीमियम लूकसह येतो आणि दुसरा एलिगंट लूकसह. लॅपटॉपचा पहिला सेल आज दुपारी १२ पासून ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आणि कंपनीची अधिकृत वेबसाइट realme.com वर आयोजित करण्यात येत आहे. वाचा: realme Book (Slim) किंमत आणि ऑफर: रिअलमी बुक (स्लिम) ची पहिली आवृत्ती ११ व्या पिढीतील इंटेल कोर i3 प्रोसेसरसह येते. जी ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह सुसज्ज आहे. हे डिव्हाइस ४४,९९९ रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. तर, दुसरा प्रकार ११ व्या पिढीचा इंटेल कोर i5 प्रोसेसरसह येतो जो ८ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेजसह सुसज्ज असून ५६,९९९ रुपयांना आज दुपारी १२ पासून ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आणि कंपनीची अधिकृत वेबसाइट realme.com वरून खरेदी करता येतील. ऑफर्सबद्दल सांगायचे तर, i3 प्रोसेसर व्हेरिएंटवर २,००० रुपयांची त्वरित सूट दिली जाईल. त्याचबरोबर i5 प्रोसेसर व्हेरिएंटवर ३,००० रुपयांची इन्स्टंट सूट दिली जाईल. लॅपटॉपचा बेस व्हेरिएंट २,००० रुपयांच्या सूटनंतर ४४,९९९ रुपयांवरून ४२,९९९ रुपयांपर्यंत खरेदी केला जाऊ शकतो. तर, i5 प्रोसेसर व्हेरिएंट ३,००० रुपयांच्या त्वरित सूटसह ५६,९९९ रुपयांवरून ५३,९९९ रुपयांपर्यंत खरेदी करता येईल. ही ऑफर फ्लिपकार्टवर HDFC बँक डेबिट, क्रेडिट आणि EMI द्वारे उपलब्ध असून लॅपटॉप रिअल ग्रे आणि रिअल ब्लू रंगात उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेल्या इतर ऑफर्सबद्दल सांगायचे तर, आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर ५,००० रुपयांची फ्लॅट सवलत दिली जाईल. तसेच, नो कॉस्ट ईएमआय अंतर्गत दरमहा ७,५०० रुपये देऊन तुम्ही तो घरी आणू शकता. मानक EMI देखील यात उपलब्ध आहे. सोबत २०,००० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. निवडक मॉडेल्सवर ४,३५० रुपयांची अतिरिक्त एक्सचेंज ऑफर देखील दिली जाईल. realme Book (Slim) ची वैशिष्ट्ये: रिअलमी बुक (स्लिम) नवीनतम 11 व्या पिढीतील इंटेल कोर i5 आणि i3 प्रोसेसरसह सादर केले गेले असून १४ इंच स्क्रीनसह येते. याचे रिझोल्यूशन २१६० x १४४० पिक्सेल आहे. लॅपटॉप १४.९ मिमी पातळ आहे आणि वजनाने फक्त १.३८ किलो आहे. यात विंडोज १० होम एडिशन देण्यात आले आहे ज्यासह मायक्रोसॉफ्ट ऑफिस २०१९ देखील येते. यात २ हरमन स्पीकर्स आहेत. हे डीटीएस एचडी स्टीरिओ साउंड इफेक्टला सपोर्ट करते. तसेच ५४ Wh ची मोठी बॅटरी देखील आहे. या लॅपटॉपमध्ये ड्युअल-फॅन स्टॉर्म कूलिंग सिस्टम आहे. लॅपटॉप चांगल्या पीडी चार्जिंगला समर्थन देतो याचा अर्थ तुम्ही रियलमी पॉवरबँकद्वारे लॅपटॉप चार्ज करू शकता. हे डिव्हाइस 256GB/512GB PCIe®️ SSD स्टोरेजसह 8GB LPDDR4x रॅमला सपोर्ट करते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jr8mAI