नवी दिल्लीः गेल्या आठवड्यात सॅमसंगने भारतात लाँच होणाऱ्या स्मार्टफोनचा टीझर जारी केला होता. हा स्मार्टफोन १ सप्टेंबरला लाँच केला जावू शकतो. परंतु, अधिकृत लाँचिंग आधीच हा स्मार्टफोन अॅमेझॉन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. अमेझॉनवर या स्मार्टफोनची केवळ किंमत पाहिली जावू शकत नाही तर पेमेंट करून याला खरेदी सुद्धा करता येवू शकते. वाचा: टॉप व्हेरियंटची किंमत बेस पेक्षा कमी अमेझॉनवर जी किंमत दिसत आहे. त्यात काहीतरी गोंधळ झालेला दिसत आहे. सॅमसंग गॅलेक्सी A52s 5G स्मार्टफोनच्या ६ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅम अशा दोन व्हेरियंट मध्ये उपलब्ध केलेला दिसत आहे. परंतु, ६ जीबी रॅम व्हेरियंटला ३८ हजार ९९९ रुपये, तर ८ जीबी रॅमला ३५ हजार ९९९ रुपयाच्या किंमतीत लिस्ट करण्यात आले आहे. त्यामुळे वाचकांना विंनती आहे की, या फोनला सविस्तर खात्री केल्यानंतर निर्णय घ्या. तसेच या फोनला अधिकृतपणे लाँचिंग होऊ द्या. तोपर्यंत वाट पाहा. Samsung Galaxy A52s 5G चे संभावित फीचर्स अमेझॉनच्या माहितीनुसार, सॅमसंग गॅलेक्सी A52s 5G स्मार्टफोन मध्ये ६.५ इंचाचा S-AMOLED डिस्प्ले दिला आहे. जो पंच होल डिझाइन, एचडी प्लस रिझॉल्यूशन आणि एक 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. फोनमध्ये Snapdragon 778G प्रोसेसर सोबत ८ जीबी पर्यंत रॅम आमि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिले जाणार आहे. यात ३ कार्ड सिम स्लॉट दिले आहे. जे फोनचे स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट मिळते. फोन अँड्रॉयड ११ आधारीत One UI 3.1 वर काम करतो. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jrVoTp