Full Width(True/False)

Realme च्या या स्मार्टफोनला आतापर्यंतचे सर्वात मोठे अपडेट, पूर्णपणे बदलून जाणार फोन

नवी दिल्लीः रियलमी (Realme) चा बजेट स्मार्टफोन रियलमी सी3 () ला भारतात अँड्रॉयड ११ (Android 11) चे अपडेट मिळणे सुरू झाले आहे. या स्टेबल अपडेट मध्ये अनेक बग्सला ठीक करण्यात आले आहे. सोबत अनेक नवीन फीचर्सला जोडण्यात आले आहे. याआधी जुलै मध्ये युजर्संसाठी अँड्रॉयड ११ चे बीटा अपडेट रिलीज करण्यात आले होते. रियलमी सी ३ स्मार्टफोनला गेल्या वर्षी अँड्रॉयड १० बेस्ड रियलमी यूआय सोबत ग्लोबल बाजारात उतरवले होते. वाचाः Realme C3 चे अपडेट ९१ मोबाइलच्या माहितीनुसार, Realme C3 साठी जारी करण्यात आलेल्या अपडेटचा बिल्ट नंबर RMX2027_11_C.04 आहे. याची साइज 168MB आहे. या अपडेटसाठी बग्सला ठीक करण्यासोबत स्टेबिलिटी मध्ये सुधारणार करण्यात आली आहे. याशिवाय, अपडेट मध्ये नवीन फीचर्स सह अनेक पॅच मिळतील. वाचाः असे चेक करा अपडेट >> जर तुम्हाला आतापर्यंत अँड्रॉयड ११ चे अपडेट मिळाले नसेल तर खाली दिलेल्या स्टेपला फॉलो करून चेक करू शकता. >> अँड्रॉयड ११ अपडेट चेक करण्यासाठी सर्वात आधी फोनच्या सेटिंगमध्ये जा. >> या ठिकाणी सॉफ्टवेयर अपडेट करण्याचा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा. >> यानंतर आपल्या फोनवर अपडेट येईल. त्याला डाउनलोड करण्याचा ऑप्शन मिळेल. >> जर अपडेट आले असेल तर त्यावर क्लिक करून डाउनलोड करा. वाचाः Realme C3 चे फीचर्स Realme C3 स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 1600 x 720 पिक्सल आणि स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 89.8 आहे. या फोनमध्ये 12nm चे ऑक्टा-कोर Helio G70 प्रोसेसर दिले आहे. याची क्लॉक स्पीड 2.0GHz आहे. याशिवाय, फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबीचे इंटरनल स्टोरेज दिले आहे. याला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 256GB पर्यंत वाढवता येवू शकते. वाचाः Realme C3 स्मार्टफोन मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात पहिला 12MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आणि दुसरा 2MP चा सेन्सर दिला आहे. तर फोनच्या फ्रंटला 5MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. जो AI टेक्नोलॉजीवर आधारित आहे. Realme C3 स्मार्टफोन मध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे. 10W चार्जिंग आणि रिवर्स चार्जिंग सपोर्ट करते. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iC5tg9