Full Width(True/False)

ग्राहकांना जोरदार झटका, Realme च्या 'या' फोनच्या किंमतीत वाढ, पाहा नवीन किंमत

नवी दिल्लीः Realme ने भारतात यावर्षी आपली Narzo 30 सीरीज लाँच केली होती. या सीरीज मध्ये स्टँडर्ड आणि प्रो मॉडलला 4G आणि 5G व्हेरियंट मध्ये उपलब्ध करण्यात आले होते. आता कंपनीने 4G च्या तिन्ही रॅम व्हेरियंट्सच्या किंमतीत वाढ केली आहे. सर्व व्हेरियंट्सच्या किंमतीत ५०० रुपयांची वाढ केली आहे. जाणून घ्या रियलमी नार्जो ३० च्या भारतातील किंमत आणि फीचर्स संबंधी सर्व माहिती. वाचा: Realme Narzo 30 4G रियलमीने भारतात नार्जो ३० ४जी स्मार्टफोनची किंमत वाढवली आहे. या बजेट स्मार्टफोनला खरेदी करण्यासाठी आता ५०० रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंटच्या किंमतीत आता १२ हजार ४९९ रुपयाऐवजी १२ हजार ९९९ रुपये मोजावे लागणार आहेत. ६ जीब रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये झाली आहे. फोनची नवीन किंमत अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आली आहे. हा फोन रेसिंग सिल्वर आणि रेसिंग ब्लू कलर मध्ये येतो. वाचा: Realme Narzo 30 4G चे स्पेसिफिकेशन्स Realme Narzo 30 4G मध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 1080×2400 पिक्सल आहे. स्क्रीनचा रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज़ आहे. हँडसेट्स मध्ये एक पंच होल दिला आहे. ज्यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. रियलमीच्या या बजेट फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G95 प्रोसेसर दिला आहे. ग्राफिक्ससाठी माली G76 GPU दिला आहे. रियलमी नार्जो 30 4G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. वाचा: फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ व मायक्रो सेन्सर दिला आहे. फोनमध्ये पॉवर देण्यासाठी ३० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी ड्यूल 4G VoLTE, 2.4/5 गीगाहर्ट्ज़ वाय-फाय 802.11 ए/बी/जी/एन/एसी, ब्लूटूथ 5.0, एनएफसी, जीपीएस/ए-जीपीएस आणि ग्लोनास सारखे फीचर्स दिले आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ALVivK