Full Width(True/False)

Realme ने भारतात लाँच केला सर्वात स्वस्त ५जी फोन, किंमत-फीचर्स एकदा पाहाच...

नवी दिल्ली : रियलमीने यावर्षीच्या सुरुवातीला आपला सर्वात स्वस्त ५जी Realme Narzo 30 5G (६ जीबी रॅम) व्हेरिएंटला भारतात लाँच केले होते. आता कंपनीने या फोनचे ४ जीबी रॅम व्हेरिएंट सादर केले असून, याची किंमत १४ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आणि फीचर्सविषयी जाणून घेऊया. वाचा: Realme Narzo 30 5G चे स्पेसिफिकेशन्स डिस्प्ले: या स्मार्टफोनमध्ये ६.५ इंच फुल एचडी+ (१०८०x२४००) पिक्सल डिस्प्ले देण्यात आला असून, याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आणि टच सँपलिंग रेट १२८० हर्ट्ज आहे. प्रोसेसर, रॅम व स्टोरेज: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी यात मीडियाटेक डायमेंसिटी ७०० ५जी चिपसेटसह ६ जीबी रॅम आणि ११८ जीबी स्टोरेज मिळेल. कॅमेरा: फोनमध्ये बॅक पॅनेलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात ४८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, २ मेगापिक्सल मोनोक्रोम आणि २ मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा सेंसर मिळेल. सेल्फीसाठी यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरी: यात ३० वॉट डार्ट चार्ज सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळेल. Realme Narzo 30 5G ची किंमत Narzo 30 5G च्या ४ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत १३,९९९ रुपये आहे. तर फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत १५,९९९ रुपये आहे. फोन रेसिंग सिल्वर आणि रेसिंग ब्लू रंगात येतो. नवीन स्टोरेज व्हेरिएंटची विक्री २४ ऑगस्टपासून रियलमीची अधिकृत वेबसाइट, फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन स्टोर्सवर सुरू होईल. उद्यापासून Realme Fan Festival 2021 Sale चे देखील आयोजन करण्यात आले आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sIjpZs