गेल्या काही दिवसांपासून भारतीय बाजारात स्मार्टफोन्सच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. शाओमी, सॅमसंग सारख्या कंपन्यांनी आपल्या फोन्सच्या किंमतीत वाढ केलेली पाहायला मिळत आहे. फोनची किंमत वाढण्यामागे सप्लाय चेनमध्ये येणारा अडथळा हे मुख्य कारण आहे. यामध्ये चिपसेट, डिस्प्ले पॅनेल, डिस्प्ले ड्राइव्हर, बॅक पॅनेल, बॅटरी सारख्या युनिट्सचा समावेश आहे. या कारणांमुळे स्मार्टफोन निर्माता कंपनी आपल्या काही हँडसेटच्या किंमती वाढवत आहेत. नुकतेच शाओमीने आपला शानदार स्मार्टफोन Redmi Note 10 च्या किंमतीत चौथ्यांदा वाढ केली आहे. यावर्षात आतापर्यंत Samsung Galaxy M02, Poco M3, Redmi 9 Power, Redmi 9A, Samsung Galaxy F02s, Vivo Y1s, Redmi Note 10 Pro सह अनेक स्मार्टफोन्सच्या किंमतीत वाढ झाली आहे. या स्मार्टफोन्सच्या किंमतीत किती वाढ झाली आहे हे सविस्तर जाणून घेऊया.

Samsung Galaxy M02
या फोनच्या किंमतीत ५०० रुपयांनी वाढ झाली असून, याच्या २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला आता ७,४९९ रुपयांऐवजी ७,९९९ रुपयात खरेदी करू शकता. तर ३ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत ८,४९९ रुपये आहे.
Poco M3
फोनच्या ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ५०० रुपयांनी वाढून १२,४९९ रुपये झाली आहे. याच्या ४ जीबी रॅम व्हेरिएंटची माहिती देण्यात आलेली नाही.
Redmi 9 Power
स्मार्टफोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ५०० रुपयांनी वाढली आहे. फोन आता १२,९९९ रुपयांऐवजी १३,४९९ रुपयात मिळत आहे.
Redmi 9A
याच्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३०० रुपये वाढली आहे. फोनसाठी ७,४९९ रुपयांऐवजी ७,७९९ रुपये मोजावे लागतील.
Samsung Galaxy F02s
फोनच्या किंमतीत ५०० रुपये वाढ झाली आहे. ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजला आता ८,९९९ रुपयांच्या जागी ९,४९९ रुपयात खरेदी करावे लागेत. तर याच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी ९,९९९ रुपयांऐवजी १०,४९९ रुपये मोजावे लागतील.
Samsung Galaxy M02s
या फोनच्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ८,९९९ रुपयांवरून ५०० ने वाढून ९,४९९ रुपये झाली आहे. तर ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९,९९९ रुपयांऐवजी १०,४९९ रुपये झाली आहे.
Samsung Galaxy A12
फोनच्या किंमत ५०० रुपयांनी वाढली आहे. याच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आता १२,९९९ रुपयांऐवजी १३,४९९ रुपये झाली आहे. तर ४ जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १३,९९९ रुपयांऐवजी १४,४९९ रुपये झाली आहे.
Vivo Y1s
फोनच्या २ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत ५०० रुपयांनी वाढली आहे. फोनला ७,९९० रुपयांच्या जागी ८,४९० रुपयात खरेदी करावे लागेल.
Vivo Y12s
याच्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ५०० रुपयांनी वाढली आहे. फोनसाठी ९,९९० रुपयांच्या जागी १०,४९० रुपये मोजावे लागतील.
Y20A
फोनच्या ३ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजची किंमत ५०० रुपयांनी वाढवण्यात आली आहे. आता ११,४९० रुपयांऐवजी ११,९९० रुपयात फोन मिळेल.
Y20G
फोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १ हजार रुपयांनी वाढली आहे. फोन १२,९९० रुपयांच्या जागी १३,९९० रुपयात मिळेल. तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत देखील १ हजार रुपयांनी वाढून १५,९९० रुपये झाली आहे.
Redmi Note 10 Pro
फोनची किंमत ५०० रुपयांनी वाढली आहे. फोनची किंमत चौथ्यांदा वाढली आहे. याच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १२,९९९ रुपयांऐवजी १३,४९९ रुपयात खरेदी करू शकता. तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत १४,९९९ रुपयाऐंवजी १५,४९९ रुपयात मिळेल.
Redmi Note 10T 5G
Redmi Note 10T 5G स्मार्टफोनची किंमत ५०० रुपयांनी वाढली आहे. ४ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत १३,९९९ रुपयांऐवजी १४,४९९ रुपये झाली आहे. तर ६ जीबी रॅम व्हेरिएंट १६,४९९ रुपयात मिळेल.
Redmi Note 10
रेडमीच्या या फोनची किंमत ५०० रुपयांनी वाढली आहे. फोनच्या ४ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत १२,९९९ रुपयांवरून १३,४९९ रुपये झाली आहे. तर ६ जीबी व्हेरिएंटची किंमत १५,४९९ रुपये आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lrGLRp