नवी दिल्लीः जपानची दिग्गज टेक कंपनी Sony ने आपला नवीन स्मार्टफोन मध्ये लाँच केला आहे. याआधी कंपनीने एक्सपीरिया 10 III ला उपलब्ध केले होते. जे स्नॅपड्रॅगन ६९० प्रोसेसर आणि ट्रिपल रियर कॅमेरा सोबत येतात. नवीन सोनी एक्सपीरिया १० III लाइट मध्ये आधीच्या फोनच्या तुलनेत कमी स्टोरेज दिले आहे. नवीन सोनी स्मार्टफोन ई-सीम फंक्शनालिटी ऑफर करते. वाचा: सोनी एक्सपीरिया 10 III लाइटला 46,800 JPY जवळपास ३१ हजार ६६५ रुपयात उपलब्ध केले आहे. हे पिंक, व्हाइट, ब्लॅक आणि ब्लू कलर मध्ये आणले आहे. या हँडसेट्सची विक्री जपानमध्ये २७ ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. वाचा: Sony Xperia 10 III Lite: स्पेसिफिकेशन्स सोनी एक्सपीरिया १० III लाइट मध्ये जास्तीत जास्त फीचर्स हे आधीच्या फोनमधील दिले आहेत. यात ६ इंचाचा ओलेड डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन फुल एचडी प्लस दिले आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशियो २१.९ दिला आहे. हे HDR सपोर्ट करतो. हँडसेटमध्ये सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. सोनीच्या या स्मार्टफोनमध्ये १२ मेगापिक्सलचा प्रायमरी ८ मेगापिक्सलचा टेलिफोटो आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर दिले आहे. वाचा: सोनीच्या या फोनला पॉवर देण्यासाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६९० प्रोसेसर दिले आहे. लाइट मॉडल मध्ये ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज आणि ६ जीबी रॅमचा पर्याय मिळतो. सोनी एक्सपीरिया 10 III लाइटला पॉवर देण्यासाठी 4500mAh ची बॅटरी दिली आहे. ३० वॉटची फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सपोर्ट करते. डिव्हाइस IP68 रेटिंग सोबत येते. म्हणजेच डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंट दिले आहे. हा फोन ई-सिम फंक्शनालिटीला सपोर्ट करतो. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37YSv5Q