नवी दिल्ली: जर तुम्ही नवीन साउंडबार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही आत्ताच या साउंडबारवर बंपर सवलत मिळवू शकता. ऑनलाईन मार्केटप्लेस Amazon साउंडबारवर उत्तम ऑफर देत आहेत. यात तुम्हाला फार पैसे देखील खर्च करावे लागणार नाही. जाणून घ्या सविस्तर. वाचा: ZEB-JUKE BAR 3800 PRO DOLBY 2.0 CHANNEL 60W SOUNDBAR: तुम्ही हा साउंडबार ZEBRONICS ZEB-JUKE BAR कडून ६,०९९ रुपयांच्या ऑफरवर खरेदी करू शकता. यावर तुम्ही सुमारे ८,९०० रुपये वाचवू शकता. या डिव्हाइसची मूळ किंमत १४,९९९ रुपये आहे. यामध्ये तुम्हाला HDMI, ऑप्टिकल इन ब्लूटूथ, USB, AUX मोडसह अनेक फीचर्स मिळतील. यामध्ये तुम्हाला काळ्या रंगाचा पर्याय मिळत आहे. हे साउंडबार डॉल्बी ऑडिओला सपोर्ट करतात. तुम्ही ते EMI वर देखील खरेदी करू शकता. दरमहा केवळ २८८ रुपये ईएमआय भरूनही साउंडबार घरी आणता येतील. AAVANTE BAR 2050 160W 2.1 CHANNEL BLUETOOTH SOUNDBAR: या डिस्काउंट ऑफर मध्ये, तुम्ही हा ब्लूटूथ साउंडबार बोट वरून फक्त ८,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. त्याची मूळ किंमत २४,९९० रुपये आहे. जर तुम्ही ते सवलतीत खरेदी केले तर त्यावर तुम्हाला तब्बल १५,९९१ रुपयांची बचत करता येईल. हे साउंडबार वायरलेस सबवूफर आहेत जे एकाधिक कनेक्टिव्हिटी मोडसह येतात. हे ब्लूटूथ V 5.0 ला सपोर्ट करतात. तुम्ही ते EMI वर देखील खरेदी करू शकता. यासाठी दरमहा ४२४ रुपये ईएमआय द्यावा लागेल. ZEBRONICS ZEB-JUKE BAR 6001 DWS PRO, 160W MULTIMEDIA SOUNDBAR झेब्रॉनिक्स साउंडबार Amazon वर ८,९९९ रुपयांच्या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. हे ब्लूटूथ सपोर्टसह मल्टीमीडिया साउंडबार असून यामध्ये आपल्याला USB, AUX आणि ऑप्टिकल इनपुट देण्यात आले आहेत. तुम्ही ते EMI वर देखील खरेदी करू शकता. ईएमआय ४२४ रुपयांपासून सुरू होतो. या साउंडबारची मूळ किंमत २५,४९९ रुपये आहे. ऑफरमध्ये, तुम्ही यावर १६,५०० रुपये वाचवू शकता. SB110 BY HARMAN POWERFUL WIRELESS SOUNDBAR: १४,९९९ रुपये किंमतीचे हे डिव्हाइस , तुम्हाला ७,९९९ रुपयांच्या सवलतीच्या किमतीत मिळत आहे. हा JBL साउंडबार अंगभूत सबवूफरसह येतो, जो तुम्ही नो कॉस्ट EMI वर देखील खरेदी करू शकता. जर तुम्ही ते अॅमेझॉन पे ICICI कार्डने खरेदी केले तर प्राइम सदस्यांना ५ टक्के कॅशबॅक आणि नॉन-प्राइम सदस्यांना ३ टक्के कॅशबॅक मिळेल. हे दरमहा ३७७ रुपयांच्या ईएमआयवर खरेदी केले जाऊ शकते. ZEBRONICS ZEB-JUKE BAR 9700 PRO DOLBY ATMOS SOUNDBAR: यावर देखील मोठी सवलत मिळत आहे. ४५,९९९ रुपये किंमतीच हे साउंडबार बेस्ट डीलवर फक्त १९,१९९ रुपयांमध्ये मिळू शकतात.म्हणजेच तुम्ही यावर २६,८०० रुपये वाचवू शकता. हे साउंडबार 4K HDR आणि ट्रिपल HDMI सपोर्टसह येतात. तुम्ही ते नो कॉस्ट ईएमआय वर देखील खरेदी करू शकता. जर तुम्ही Amazon पे, ICICI कार्ड धारक असाल तर तुम्ही अतिरिक्त सूट देखील घेऊ शकता. प्राइम मेंबर्ससाठी ५ % आणि नॉन-प्राइम मेंबर्ससाठी ३% कॅशबॅकमिळेल. हे दरमहा ९०४ रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करता येते. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38lkJYI