Upcoming Smartphone: भारतात या आठवड्यात अनेक जबरदस्त स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये स्लीम आणि लाइटवेट स्मार्टफोन Motorola Edge 20 चा समावेश आहे. या स्मार्टफोनमध्ये 108MP कॅमेरा दिला जाणार आहे. सोबत सर्वात स्लीम लॅपटॉप Realme Book सु्दधा याच आठवड्यात भारतात लाँच करण्यात येणार आहे. एकूण मिळून या आठवड्यात ६ स्मार्टफोन्स म्हणजेच अर्धा डझन स्मार्टफोनची लाँचिंग होणार आहे. ज्याला कुणाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल त्यांच्यासाठी हा आठवडा खास राहणार आहे. कारण, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, Samsung चे फोल्डेबल स्मार्टफोन Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip सुद्धा २० ऑगस्ट रोजी लाँच केला जावू शकतो, १७ ऑगस्ट आणि १८ ऑगस्ट या दोन दिवसात कोणकोणत्या कंपनीचे स्मार्टफोन लाँच होणार आहेत, जाणून घ्या डिटेल्स.

Moto Edge 20
या फोनला १७ ऑगस्ट रोजी लाँच करण्यात येणार आहे. या फोनची संभावित किंमत ४५ हजार रुपये आहे. मोटोचा हा स्मार्टफोन भारतातील सर्वात स्लीम स्मार्टफोन असणार आहे. या फोनमध्ये पहिल्यांदा Snapdragon 778G प्रोसेसर ला 11 5G Bands सोबत आणले जाईल. फोनला ८ जीबी रॅम सपोर्ट सोबत आणले जाईल. हा भारतातील पहिला Snapdragon 778 चिपसेटचा स्मार्टफोन असेल. फोनमध्ये डेस्कटॉप, गेमिंग आणि व्हिडिओ कॉलिंगचे जबरदस्त फीचर्स असणार आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजेच यात १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाणार आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जावू शकतो.
Moto Edge 20 Fusion
या स्मार्टफोनला १७ ऑगस्ट रोजी लाँच करण्यात येणार आहे. या फोनची संभावित किंमत ३० हजार रुपये आहे. Motorola Edge 20 Fusion स्मार्टफोन Edge 20 Lite चे रिब्रँड व्हर्जन असेल. या स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा ओएलईडी डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 720 प्रोसेसर आणि 5,000mAh ची बॅटरी दिली आहे, जी 30W TurboPower फास्ट चार्जिंग सपोर्ट येईल. या स्मार्टफोनमध्ये रियर कॅमेरा सेटअप सोबत प्रायमरी सेन्सर १०८ मेगापिक्सलचा आहे. तर ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर असेल. या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो.
iQOO 8 5G
iQOO 8 5G या स्मार्टफोन ला १७ ऑगस्ट रोजी लाँच केले जाणार आहे. या फोनची संभावित किंमत ४२ हजार रुपये आहे. या फोनमध्ये 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट सोबत 2K AMOLED डिस्प्ले असेल. हा Samsung AMOLED E5 luminescent एलटीपीओ 10 बिट स्क्रीन सोबत येईल. स्पीड आणि मल्टीटास्कींगसाठी फोनमध्ये Qualcomm Snapdragon 888+ SoC सोबत १२ जीबी रॅम आणि ४ जीबी रॅम एक्सटेंडेड रॅम फीचर मिळेल.
Realme GT
या फोनला १८ ऑगस्ट रोजी लाँच केले जाणार आहे. या फोनची संभावित किंमत ३५ हजार रुपये आहे. या फोनमध्ये ६.४३ इंचाचा एक मोठा डिस्प्ले मिळेल. फोनमध्ये ५ एनएम प्रोसेस Qualcomm Snapdragon 888 5G चा सपोर्ट मिळेल. या फोनमध्ये सोनीचा ६४ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनला पॉवर देण्यासाठी 4,500mAh ची बॅटरी दिली जावू शकते. या फोनला 65W SuperDart चार्जिंगचा सपोर्ट मिळेल.
Realme GT Master Edition
या फोनला १८ ऑगस्ट रोजी लाँच केले जाणार आहे. या फोनची संभावित किंमत ३५ हजार रुपये आहे. Realme GT Master Edition या फोनमध्ये ६.४३ इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट १२० एचझेड आहे. फोन ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७७८ प्रोसेसर सपोर्ट सोबत येईल. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4300mAh ची बॅटरी दिली आहे. जी 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येईल.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3soffWj