नवी दिल्ली : विवोने वाय-सीरिज अंतर्गत नवीन Vivo Y21 ला भारतात लाँच केले आहे. या स्मार्टफोनमध्ये आयपीएस एलसीडी डिस्प्ले आणि ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबतच, ड्यूल रियर कॅमेरा सेटअप आणि ५००० एमएएचची बॅटरी मिळेल. हा स्मार्टफोन भारतीय बाजारात , , , रियलम आणि पोकोच्या स्मार्टफोन्सला टक्कर देईल. वाचा: Vivo Y21 चे स्पेसिफिकेशन्स शानदार डिझाइनसह येणाऱ्या विवो वाय२१ मध्ये ६.५ इंच आयपीएस एलसीडी वॉटर-ड्रॉप डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिझॉल्यूशन १६००x७२० पिक्सल आहे. याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आणि आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. यामध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. फोनमध्ये अँड्राइड ११ आधारित फनटच ११.१ स्किन आउट-ऑफ-द-बॉक्स आणि ऑक्टा-कोर हीलियो पी३५ चिपसेट सपोर्ट मिळेल. ड्यूल रियर कॅमेरा मध्ये ड्यूल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा १३ मेगापिक्सल आणि अन्य २ मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. मिळेल ५००० एमएएचची बॅटरी पॉवरसाठी फोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरी १० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. याशिवाय यामध्ये ड्यूल सिम स्लॉट, ४जी VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ ५.०, जीपीएस, ग्लोनेस, Beidou, ३.५एमएम ऑडिओ जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळेल. Vivo Y21 चे अन्य फीचर्स फोनच्या पॉवर बटनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे. याच्या इंटर्नल स्टोरेला मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवू शकता. फोनचे वजन १८२ ग्रॅम आहे. Vivo Y21 ची किंमत Y21 स्मार्टफोन डायमंड ग्लो आणि मिडनाइट ब्लू रंगात येतो. या फोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजची किंमत १३,९९० रुपये आहे. तर टॉप मॉडेल ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजची किंमत १५,४९० रुपये आहे. स्मार्टफोनला कंपनीचे अधिकृत ई-स्टोर, , , पेटीएम, टाटा क्लिक आणि अन्य रिटेल स्टोरवरून खरेदी करू शकता. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2W9sb6M