Full Width(True/False)

WhatsApp मध्ये आले आणखी एक नवीन फीचर, लिंक शेयर करण्याची पद्धत बदलली

नवी दिल्लीः गेल्या काही आठवड्यापासून पॉप्युलर इंस्टेंट मेसेजिंग अॅप खूपच चर्चेत आहे. कंपनी आपल्या युजर्संसाठी नवीन नवीन फीचर आणत आहे. युजर्संची चॅटिंग आणि व्हॉट्सअॅप युज करण्याचा एक्सपीरियन्स आधीच्या तुलनेत चांगला व्हावा, यासाठी कंपनीचा प्रयत्न आहे. कंपनीने चॅट हिस्ट्रीला अँड्रॉयड आणि iOS डिव्हाइस दरम्यान ट्रान्सफर करण्यासाठी एक नवीन फीचर रोलआउट केले होते. नवीन फीचर्स आणण्याच्या या यादीत आता कंपनीने युजर्ससाठी व्हॉट्सअॅप मध्ये लिंक शेयरिंग करण्यासाठी एक खास फीचर रोलआउट करणे सुरू केले आहे. वाचा: अँड्रॉयड आणि iOS यूजर्ससाठी रोलआउट होत आहे फीचर गेल्या महिन्यात बातमी समोर आली होती की, कंपनी एक असे फीचर वर काम करीत आहे. जी युजर्सला लिंक शेयर करताना थंबनेल (thumbnail) इमेजचा मोठा प्रिव्यू पाहण्याची सुविधा देईल. कंपनी या फीचरला आता अँड्रॉयड आणि iOS बीटा यूजर्ससाठी रोलआउट करीत आहे. वाचा: WABetaInfo ने दिली नवीन फीचरची माहिती व्हॉट्सअॅपमध्ये आलेल्या या नवीन फीचरची माहिती WABetaInfo ने दिली आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, हे फीचर अँड्रॉयड बीटा व्हर्जन 2.21.17.15 आणि iOS बीटा व्हर्जन 2.2.1.160.17 साठी रिलीज केले आहे. कंपनी या बीटा अपडेटसाठी बेचेज मध्ये रोलआउट करीत आहे. आज रात्रीपर्यंत जवळपास सर्वच युजर्स पर्यंत पोहोचेल. वाचा: बीटा टेस्टिंगनंतर येईल स्टेबल व्हर्जन जर तुम्ही बीटा युजर्स आहात आणि तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅपला लेटेस्ट बीटा व्हर्जनने अपडेट केले आहे. तर तुम्ही आता लिंक शेयर करताना आधीच्या तुलनेत मोठा प्रिव्ह्यू पाहू शकता. व्हॉट्सअॅपमध्ये लिंक शेयर करताना युजर्संना छोटी थंबनेल दिसत होती. कंपनी या फीचरला स्टेबल व्हर्जनला बीटा टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर ग्लोबल युजर्ससाठी रिलीज करणार आहे. वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3z2AoaW