Full Width(True/False)

Xiaomi लाँच करतेय Superstar स्मार्टफोन, डिझाइनमुळे अनेक जण प्रेमात, पाहा किंमत आणि फीचर्स

नवी दिल्लीः शाओमी कंपनी लवकरच आपला आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा फोन सुपरस्टारपेक्षा कमी नाही. Redmi 9 Prime च्या यशानंतर कंपनी आता ला सप्टेंबर महिन्यात लाँच करणार आहे. Redmi India ने एक नवीन स्मार्टफोनच्या आगमनाचा टिझर लाँच केला आहे. या टीझरने डिव्हाइसच्या नावाचा खलासा केला नाही. हा फोन भारतात ३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता लाँच केला जाणार आहे. वाचा: Redmi 10 Prime मध्ये हे फीचर्स मिळू शकतात Redmi 10 Prime मध्ये एक पंच होल डिझाइन सोबत ६.५ इंचाचा एलसीडी पॅनेल मिळू शकते. जे एक पूर्ण एचडी प्लस रिझॉल्यूशन आणि एक 90Hz देते. यात ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. यात रियर पॅनेलमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड लेन्स, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो स्नॅपर असू शकतो. वाचा: Redmi 10 Prime मध्ये हीलियो जी88 चिपसेट आणि ६ जीबी रॅम दिला जावू शकतो. यात फोनला पॉवर देण्यासाठी 5,000mAh ची बॅटरी दिली जावू शकते. 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जावू शकतो. हा फोन MIUI 12.5 आधारित Android 11 OS सोबत प्रीइंस्टॉल्ड येईल. Redmi 10 Prime एक साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर सोबत येईल. हा एक ड्युअल 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ, GPS, IR ब्लास्टर, USB-C आणि 3.5mm ऑडियो जॅक यासारखी सुविधा दिली आहे. भारतात या फोनची किंमत ११ हजार रुपये ते १५ हजार रुपये या दरम्यान असू शकते. वाचा: वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3B1oUVY