नवी दिल्लीः सॅमसंग (Samsung) आपला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन घेऊन येण्याची तयारी करीत आहे. सध्या कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन आहे. GalaxyClub.nl ने खुलासा केला आहे की, सॅमसंग आता एक नवीन A-Series स्मार्टफोनवर काम करीत आहे. हा स्मार्टफोन 5G आहे. सॅमसंग गॅलेक्सी A13 5G गेल्यावर्षी आलेल्या Galaxy A12 चा सक्सेसर असेल. इतकी असू शकते किंमत रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, Samsung Galaxy A13 5G कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन असणार आहे. परंतु, गॅलेक्सी A13 5G चे स्पेसिफिकेशंस समोर आले नाहीत. GalaxyClub.nl ने म्हटले की, गॅलेक्सी A13 5G स्मार्टफोनचे मॉडल नंबर SM-A136B आहे. सॅमसंग गॅलेक्सी A22 5G स्मार्टफोन 229 यूरो (जवळपास १९ हजार ७०० रुपये) किंमतवर आला होता. त्यामुळे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, सॅमसंग गॅलेक्सी A13 5G स्मार्टफोन २०० यूरोपेक्षा कमी म्हणजेच १७ हजार रुपये असू शकते. यावर्षीच्या अखेरपर्यंत किंवा पुढील वर्षीच्या सुरुवातीला येऊ शकतो फोन Samsung Galaxy A12 स्मार्टफोन गेल्यावर्षी डिसेंबर मध्ये आला होता. Samsung Galaxy A13 5G स्मार्टफोन यावर्षीच्या अखेर पर्यंत किंवा पुढील वर्षीच्या सुरुवातीला येवू शकतो. सॅमसंग गॅलेक्सी A12 स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा एलसीडी पॅनेल दिला आहे. हे एचडी प्लस रिझॉल्यूशन ऑफर करतो. सॅमसंगचा हा स्मार्टफोन elio P35 प्रोसेसर सोबत येतो. हे ६ जीबी रॅम पर्यंत येतो. स्मार्टफोनमध्ये 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेज दिले आहे. फोनमध्ये 5,000 mAh ची बॅटरी दिली आहे. १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. सॅमसंग गॅलेक्सी A12 मध्ये ४८ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा सॅमसंग गॅलेक्सी A12 स्मार्टफोनच्या बॅक मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या बॅक मध्ये मेन कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा आहे. याशिवाय, फोनच्या बॅक मध्ये ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स, २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ असिस्ट लेन्स दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yt7e3S